Corona vaccination | देशात 100 कोटी कोरोना लसीचा टप्पा ओलांडल्याचं जंगी सेलीब्रेशन होणार! कैलाश खेर यांचं गाणं लाँच
भारत लवकरच लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. या निमित्ताने गायक कैलाश खेर यांच्या आवाजातील एक थीम साँग देशभरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी लाँच करण्यात येणार आहे.
![Corona vaccination | देशात 100 कोटी कोरोना लसीचा टप्पा ओलांडल्याचं जंगी सेलीब्रेशन होणार! कैलाश खेर यांचं गाणं लाँच Corona vaccination 100 crore dose minitser Mansukh Mandaviya launched a special vaccine song in the voice of Kailash Kher Corona vaccination | देशात 100 कोटी कोरोना लसीचा टप्पा ओलांडल्याचं जंगी सेलीब्रेशन होणार! कैलाश खेर यांचं गाणं लाँच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/16/09187c167a2cd2d6563283856d1fe9b6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत लवकरच मोठं यश संपादन करणार आहे. देश कोरोना विरोधातील या लढाईत प्रमुख्य शस्त्र असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा पार करणार आहे. अशा परिस्थितीत हे यश साजरं करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून एक थीम साँग लाँच केले जाणार आहे. लसीकरणाने 100 कोटींचा आकडा ओलांडताच हे थीम साँग देशभरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे.
कैलाश खेर यांच्या आवाजात हे थीम साँग 100 कोटी डोस पूर्ण झाल्यानंतर लाँच केले जाईल. त्याच वेळी, आज म्हणजेच शनिवारी देखील एक गाणे लाँच करण्यात आले आहे. हे गाणे लसीकरणाच्या जाहिरातीसाठी आहे, जे पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत तेल आणि वायू कंपन्यांनी संयुक्तपणे बनवले आहे. कैलाश खेर यांनीच या गाण्याला आवाज दिला आहे. लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा आकडा सोमवारपर्यंत ओलांडण्याचा अंदाज आहे.
काय म्हणाले मनसुख मांडवीया?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, देशातील 97 कोटीहून अधिक लोकांना पहिला डोस दिला गेला आहे. पंतप्रधान मोदींनी भारतातील शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला आणि भारतात बनवलेली लस देशाच्या वापरात आली, यासाठी आम्हाला पूर्वीप्रमाणे परदेशांवर अवलंबून राहावे लागले नाही. आगामी काळात आम्ही 100 कोटी डोस देण्यास सक्षम असू.
टीके से बचा है देश टीके से
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 16, 2021
टीके से बचेगा देश टीके से....#BharatKaTikakaran pic.twitter.com/aXfB8n65J7
ते म्हणाले, 100 कोटी डोस पूर्ण झाल्यानंतर, कैलाश खेर यांचे स्वतंत्र थीम साँग लाँच केले जाईल जे सर्व सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी ऐकायला मिळणार आहे. आजचे थीम साँग लसीकरण प्रमोशनसाठी आहे, जे पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत तेल आणि वायू कंपन्यांनी संयुक्तपणे बनवले आहे.
त्याचवेळी, कैलास खेर म्हणाले की, लसीबाबत देशात अजूनही निरक्षरता आणि चुकीची माहिती असल्याची परिस्थिती आहे, हे थीम साँग फक्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जारी केले जात आहे. हे गाणे केवळ मनोरंजनासाठीच नाही तर निरीक्षणासाठीही बनवले आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी काय म्हणाले?
हरदीपसिंग पुरी म्हणाले, 25 मार्च 2020 रोजी जेव्हा कोरोनामुळे देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, तेव्हा आमच्याकडे या साथीच्या विरूद्ध लढण्यासाठी काहीच नव्हते, आज आम्ही अशा स्थितीत आहोत की पुढील काही दिवसात देशातील कोरोना लस 100 कोटी लोकांना दिली जाईल. या लसीबद्दल विविध गैरसमज पसरवले गेले होते, परंतु आज ही एक जनचळवळ बनली आहे.
ते म्हणाले, 2004 ते 2014 दरम्यान काँग्रेस सरकार सत्तेत असताना सार्वजनिक क्षेत्रातील लसीकरण कंपन्या बंद होत्या. काँग्रेसने लसीबद्दल अफवा पसरवल्या. राजस्थानमध्ये कचऱ्यामध्ये लस टाकण्यात आली तर पंजाबमध्ये नफेखोरी झाली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)