एक्स्प्लोर
ते द्वेषाचं राजकारण करतात, आम्ही प्रेमाचं : राहुल गांधी
भारत देश सर्वांचा आहे, प्रत्येक धर्माचा आहे, प्रत्येक जातीचा आहे. त्यामुळे काँग्रेस प्रत्येकासाठी काम करेल, असेही राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली : देशात द्वेष पसरवला जात आहे, देशाला विभागलं जात आहे, मात्र आपण देशाला जोडण्याचं काम करुया, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना केले. ते काँग्रेस महाअधिवेशनाच्या छोटेखानी भाषणात बोलत होते. “काँग्रेसचं हे महाअधिवेशन बदलाची भाषा करेल. काँग्रेस बदल करते, मात्र भूतकाळ विसरत नाही. अनुभवी नेत्यांना सोबत घेऊन, त्यांच्या मार्गदर्शनात तरुण नेतृत्त्व काँग्रेसला पुढे घेऊन जाईल.”, असे राहुल गांधी यांनी सांगितले. वाचा : राहुल गांधींचं ट्विटर हँडल बदललं, फोटोसह स्टेटसही अपडेट भारत देश सर्वांचा आहे, प्रत्येक धर्माचा आहे, प्रत्येक जातीचा आहे. त्यामुळे काँग्रेस प्रत्येकासाठी काम करेल, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, “देश थकलेल्या अवस्थेत आहे. तरुणांना रोजगार देण्यात पंतप्रधान मोदी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे देशातील तरुणांना मोदींकडून आशा राहिली नाही.” LIVE UPDATE : - ज्येष्ठांच्या नेतृत्त्वातच तरुण नेतृत्त्व काँग्रेसला पुढे नेईल : राहुल गांधी - देशाला केवळ काँग्रेसच योग्य मार्ग दाखवू शकते - राहुल गांधी - पक्षातील अनुभवी नेत्यांना सोबत घेऊनच काँग्रेस पुढे जाईल - राहुल गांधी - आपल्याला तोडण्याचं नव्हे, जोडण्याचं काम करायचं आहे - राहुल गांधी - देशात द्वेष पसरवलं जात आहे - राहुल गांधी - दिल्लीत काँग्रेसचं महाअधिवेशन, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाला सुरुवात - दिल्लीत काँग्रेसचं महाअधिवेशन, थोड्याच वेळात राहुल गांधी यांचं भाषण नवी दिल्ली : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पुढची दिशा काय असेल, यावर आज काँग्रेस अधिवेशनात महत्वाची खलबतं होणार आहेत. शिवाय अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच या अधिवेशनात भाषण देखील करणार आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित आहेत. या तीन दिवसात येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकटी देण्याचं काम केलं जाणार आहे. देशभरातून तब्बल 12 हजार कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. येत्या काही दिवसात कर्नाटक विधानसभा निवडणुका आहेत. त्यापाठोपाठ राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही विधानसभेचा आखाडा तापणार आहे. त्यामुळे यात काँग्रेस काय रणनीती ठरवते हे पाहणं महत्वाचं आहे. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे. सर्व मोदी विरोधकांना एकत्र करुन मोट बांधण्याचे प्रयत्नही सुरु झालेत. त्यावरही अधिवेशनात चर्चा होऊ शकते.
आणखी वाचा























