एक्स्प्लोर
राहुल गांधी भल्या पहाटे एटीएमच्या रांगेत
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भल्या पहाटेच एटीएमबाहेर उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला. दिल्लीतल्या जहांगीरपुरी परिसरातल्या एटीएमबाहेर राहुल गांधी अचानक पोहोचल्यानं नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला.
पंतप्रधान मोदींनी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर देशभरात नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या समस्यांविषय़ी आणि होणाऱ्या त्रासाविषयी राहुल गांधींनी लोकांशी संवाद साधला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर विविध राजकिय नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसंच मोदी सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांनाच त्रास होत असल्याचा आरोपही केला आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेबाहेर रांगेतही उभे होते. आता भल्या पहाटे राहुल गांधी एटीएमच्या रांगेतील नागरिकांना भेटायला गेल्यानं पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement