एक्स्प्लोर
Advertisement
आधारशी लिंक नसल्याने UIDAI प्रकल्प व्यवस्थापकांचंच सिम कार्ड बंद!
सिम कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2018 पर्यंतची मुदत दिली आहे.
कर्नाटक : बंगळुरुतील एका दूरसंचार कंपनीने एका व्यक्तीचं सिम कार्ड आधारशी लिंक नसल्याने बंद केलं. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचं हे सिम कार्ड होतं, ती व्यक्ती आधार कार्ड जारी करणारी संस्था आधार प्राधिकरणाचे (UIDAI) प्रकल्प व्यवस्थापक आहेत. प्रकल्प व्यवस्थापक प्रभाकर एचएल कर्नाटकात सेंटर फॉर ई-गव्हर्नन्ससाठी काम करतात.
सिम कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2018 पर्यंतची मुदत दिली आहे. या तारखेपूर्वी कोणतीही कंपनी सिम कार्ड बंद करु शकत नाही.
''कंपनीने सिम कार्ड आधारशी लिंक नसल्याने बंद केलं. ओटीपीने रिव्हेरिफिकेशन केल्याचं कंपनीला सांगितलं होतं, मात्र कनेक्शन चालू ठेवण्यासाठी फिंगरप्रिंट आणि एक प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्याचं कंपनीने सांगितलं,'' अशी माहिती प्रभाकर यांनी दिली.
UIDAI चा नियम काय सांगतो?
दरम्यान, UIDAI च्या आदेशानुसार, ओटीपीने रिव्हेरिफिकेशन केल्यानंतर कशाचीही गरज नाही. तुम्ही ओटीपीने रिव्हेरिफिकेशन करु शकता, त्यासाठी दूरसंचार कंपनीच्या कार्यालयात जाण्याची किंवा फिंगरप्रिंट आणि इतर कागदपत्र देण्याची गरज नाही, असं UIDAI च्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे.
''गेल्या आठवड्यात सोमवारपासून सिम कार्ड बंद होतं. कस्टमर केअरला फोन करुन याबाबत विचारणा केली. तर फिंगरप्रिंट देणं गरजेचं असून त्यानंतरच सिम कार्ड चालू होईल, असं कस्टमर केअरने सांगितलं. मात्र ओटीपीने रिव्हेरिफिकेशन केलं असून याबाबतचा नियम मला माहित आहे, असं कंपनीला सुनावलं'', अशी माहिती प्रभाकर यांनी दिली.
''आमचीच संस्था लोकांना आधार कार्ड देते आणि दूरसंचार कंपनीने मलाच मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला'', याबद्दल प्रभाकर यांनी नाराजीही व्यक्त केली.
दरम्यान, आधारशी लिंक नसल्याने कोणतंही सिम कार्ड बंद केलं जात नसल्याचं स्पष्टीकरण दूरसंचार कंपनीने दिलं आहे. सिम कार्ड आधारशी लिंक करण्याचा आदेश गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर सरकारकडून या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. दूरसंचार कंपन्याही त्यासाठी सतत फोन आणि मेसेज करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement