एक्स्प्लोर

'अंत्यसंस्कारांऐवजी गोव्याला जाऊन एक-एक पेग मारा...'

सुरत : गुजरातच्या सुरतमधल्या ऊघाना परिसरात एका तरुणीने बिल्डिंगमधून उडी मारुन आत्महत्या केली आहे. वात्सल्य अपार्टमेंटच्या 11 व्या मजल्यावरुन उडी मारुन दिव्या बोरखतरियाने आयुष्य संपवलं. प्रेमप्रकरणाबाबत पालक नाखुश असल्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं वृत्त आहे.   दिव्याच्या स्कूटीच्या डिकीतून सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे. आई-वडिलांच्या नावे लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये अंत्यसंस्कारांवर खर्च न करता गोव्यात जाऊन एक-एक पेग मारा असा उल्लेख आहे.   काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?   माझं पालनपोषण केल्याबद्दल आभार. तुम्ही माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले होते. लग्नासाठी दोन वर्ष वाट बघ किंवा ब्रेकअप कर. मी दोन वर्ष वाट पाहू शकत नव्हते. त्यामुळे माझ्याकडे एकच पर्याय उरला. जेव्हा तुम्ही ही चिठ्ठी वाचत असाल, तेव्हा मी निवडलेल्या पर्यायाविषयी तुम्हाला समजलं असेलच.   आई, तुझे रोजचे टोमणे ऐकून मी वैतागले होते. माझ्यात आणखी हिंमत उरलेली नाही. जिगर (भाऊ) मम्मी-पप्पांची काळजी घे, त्यांना आनंदात ठेव. मोठं होऊन त्यांचं नाव उज्ज्वल कर. लव्ह यू मम्मी, पप्पा, भाऊ आणि आजोबा. --- 20 वर्षीय दिव्या एसवायबीकॉमची विद्यार्थिनी होती. कॉलेजसोबतच ती ब्यूटी पार्लर आणि कोचिंग क्लासेसही चालवत होती. सहा महिन्यांपूर्वी ती एका ऑफिसमध्ये डाटा एन्ट्रीचं काम करत असे. तिथल्या एका तरुणासोबत तिचं प्रेम जुळलं. मात्र याची कुणकुण ऑफिसमध्ये लागताच दोघांनाही कामावरुन काढून टाकण्यात आलं.   दिव्याला त्या तरुणासोबत लग्न करायचं होतं. तिच्या वडिलांनी तिला परवानगी दिली, मात्र तिच्यापुढे दोन अटी ठेवल्या. शिक्षण पूर्ण करुन लग्नासाठी दोन वर्ष वाट बघ किंवा ब्रेकअप कर. मात्र राग डोक्यात घालून तिने शनिवारी वात्सल्य सोसायटी गाठली. स्कूटी पार्क करुन लिफ्टने 11 व्या मजल्यावर गेली आणि उडी मारुन आयुष्य संपवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget