एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात वाजपेयींच्या पुतणी मैदानात!
CM रमण सिंह आज राजनांदगाव येथून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने हा मुकाबला रोचक बनविला आहे.
रायपूर: छत्तीसगडमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलंय. विद्यमान मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या समोर दिवंगत माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणीचे कडवे आव्हान असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
CM रमण सिंह आज राजनांदगावमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, जिथून ते 2008 पासून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसकडून यावेळी त्यांच्या विरोधात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने हा मुकाबला रोचक बनविला आहे. शुक्ला देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
करुणा शुक्ला 14 व्या लोकसभा निवडणुकीत जांजगीरमधून निवडून आल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावरून दूर झाल्यानंतर भाजपकडून शुक्ला यांना वारंवार डावलले गेल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रमण सिंह सरकारच्या विरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवल्याने त्यांना काँग्रेसने रमण सिहांच्याच विरोधात उमेदवारी दिली आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
90 सदस्यीय छत्तीसगड विधानसभेसाठी नक्षलग्रस्त भागातील 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 12 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 49 तर काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement