
Mamata Banerjee Loses: बंगालमध्ये 'गड आला पण सिंह गेला', नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव
Mamata Banerjee Loses: नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे.

कोलकाता: देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. याआधी ममता बॅनर्जी यांचा 1200 मतांनी विजय मिळवला असल्याबाबत एएनआयनं माहिती दिली होती. त्यामुळं ममता यांचा विजय झाला असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे.
ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही 221 हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
ममता यांच्या पराभवानंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी देखील ट्वीट केलं आहे. काही मोठ्या लढाया जिंकण्यासाठी बलिदान तर द्यावंच लागतं, असं त्यांनी म्हटलंय.
“For winning a greater battle, you must sacrifice something.” @MamataOfficial
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) May 2, 2021
दुसरीकडे तृणमूलनं ट्वीट करत म्हटलं आहे की, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कृपया अंदाज काढू नका.
The counting process for Nandigram has not been completed. Please do not speculate.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) May 2, 2021
ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला असला तरी पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असंच दिसतंय. नंदीग्राममध्ये सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सुरुवातीला भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत 2700 मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर लगेचच शुभेन्दु अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले. नंदीग्राममधील मतमोजणीमुळे क्षणाक्षणाला अनेकांचा काळजाचा ठोका चुकत होता.
Sanjay Raut : 'शेरणी हरली नाही ती जिंकली, ही देशासाठी सकारात्मक बाब' : संजय राऊत
नंदीग्राममध्ये नंदीग्राम एक आणि नंदीग्राम दोन असे भाग पडतात. पहिल्या भागात शुभेन्दु अधिकारी आघाडीवर होते. दुसऱ्या भागातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर ममतादीदींनी आघाडी घेतली. सध्याच्या कलानुसार, तृणमूलने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना 213 च्या वर जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनेही 77 जागांवर आघाडी घेतली आहे.
नंदीग्राममध्ये चुरशीने 88 टक्के मतदान झालं होतं. या मतदार संघात मुस्लिम मते निर्णायक आहेत. गेल्या निवडणूकीत तृणमूलचे उमेदवार असलेल्या शुभेन्दु अधिकारी यांनी डाव्या पक्षाच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मागील 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा वोट शेअर 44.9 टक्के होता तर भाजपचा 10.2 टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला 37.9 टक्के मतं मिळाली होती तर इतरांच्या खात्यात 7 टक्के मतं होती.
महत्वाच्या बातम्या:
- Election Results 2021: पश्चिम बंगालच्या मतदारांनी भाजपला का नाकारलं? भाजपच्या अपयशाची कारणे काय आहेत?
- West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगालमधील यशाबद्दल शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
- Election Results 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सत्ता कोणाची? भाजपची प्रशंसा करत संजय राऊत यांचं भाकित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
