एक्स्प्लोर
'नीट'प्रश्नी मुख्यमंत्री आज पंतप्रधानांची भेट घेणार
मुंबई : 'नीट' परीक्षेबाबत तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. या भेटीत मुख्यमंत्री राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मोदींसमोर मांडतील. शिवाय 'नीट' प्रश्नी केंद्र सरकारने तोडगा काढावा, अशी विनंतीही मुख्यमंत्री मोदींना करणार आहेत.
'नीट' परीक्षेच्या घोळाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांसह दोन दिवसांपूर्वी 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी नीटबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी 'नीट'प्रश्नी केंद्र सरकार काही करु शकेल का, अशी विनंती पंतप्रधानांना करणार असल्याचं आश्वासन फडवणीस यांनी विद्यार्थ्यांना दिलं होतं.
सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?
दरम्यान यंदाच्या वर्षासाठी सीईटी परीक्षा कायम ठेवून तसा अध्यादेश काढावा आणि पुढील वर्षापासून 'नीट'ची अंमलबजावणी करावी अशी महाराष्ट्राची भूमिका आहे. 'नीट'बाबत राज्याची ही भूमिका इतर राज्यांनी स्वीकारल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात
येत्या तीन ते चार दिवसात 'नीट' परीक्षेसंदर्भातील चित्र स्पष्ट होईलच. मात्र विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरु ठेवावा, असं आवाहन तावडेंनी केलं आहे. संबंधित बातम्या 'नीट' प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘नीट’ प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही ‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली ‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेशअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement