एक्स्प्लोर

Russia Ukraine War : ट्रेनमध्ये चढलात तर गोळ्या घातल्या जातील, युक्रेन नागरिकांकडून धमकावल्याचा भारतीय विद्यार्थिनीचा दावा   

Russia Ukraine War : ट्रेनमध्ये चढलात तर गोळ्या घातल्या जातील, अशी धमकी युक्रेन नागरिकांकडून दिल्याचा भारतीय विद्यार्थिनीने दावा केला आहे.   

Russia Ukraine War : भारतीय मुलांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर गोळ्या घातल्या जातील, अशी धमकी देत भारतीय महिलांना युक्रेनमध्ये मारहाण करण्यात आली आहे. याबरोबरच भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखले जात आहे, अशी माहिती खारकिव्हमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थीनीने दिली आहे.  

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने हल्ला केला आहे. त्यामुळे तेथील लोक शहर सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये चढू दिले जात नाही. शिवाय ट्रेनमध्ये चढला तर गोळ्या घालण्यात येतील अशी धमकी दिली जात आहे. अशी माहिती खारकिव्ह येथून युक्रेन-रशिया सीमेवर पोहोचल्यानंतर सेजल नावाच्या विद्यार्थीनीने एबीपी न्यूजसोबत बोलताना दिली आहे. 

सेजल हिने सांगितले की, "युक्रेनचे नागरिक भारतीय नागरिकांसोबत गैरवर्तन करत आहेत. खारकिव्ह शहर  सोडण्यास सांगण्यात आल्यानंतर आम्ही ट्रेनमधून रशियाच्या सीमेवर जाण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, आम्हाला मारहाण करून ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. आम्ही 30 किलोमीटर चालल्यानंतर कसे तरी युक्रेन-रशिया सीमेवर सुरक्षित ठिकाणी पोहोचलो.परंतु, खारकिव्हमध्ये युक्रेनियन लोकांनी भारतीयांना खूप त्रास दिला. अजूनही 1500 विद्यार्थी खारकिव्हमध्ये अडकले, असल्याचे सेजलने सांगितले. 

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. युक्रेनकडून आतापर्यंत रशियाचे सहा हजार पेक्षा जास्त सैनिक मारले गेल्याचे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तर रशियाने युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असल्याचे म्हटले आहे. 

युक्रेनमधील खारकिव्हमध्ये अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.  

Ukraine Students : भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये प्रवेश मिळेना, खारकिव्ह सोडायचं तरी कसं?

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget