(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोलकात्यातील इंडियन म्युझियममध्ये CISF जवानाकडून अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू
Bengal News : कोलकाता येथील पार्क स्ट्रिट येथे असलेल्या भारतामधील सर्वात जुन्या इंडियन म्युझियममध्ये CISF जवानाने अंदाधुंद गोळीबार केला.
Bengal Latest News : कोलकाता येथील पार्क स्ट्रिट येथे असलेल्या भारतामधील सर्वात जुन्या इंडियन म्युझियममध्ये CISF जवानाने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इंडियन म्युझियमच्या सीआयएसएफ बॅरकजवळ ही दुर्घटना घडली आहे.
कोलकातामधील पार्क स्ट्रीट येथे असलेल्या इंडियन म्युझियमसाठी सुरक्षेसाठी तैणात असेलल्या सीआयएसएफच्या एका जवानाने सहकाऱ्यावर एके 47 रायफलने अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही जवानांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झालाय. तर दुसरा जवान गंभीर जखमी आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पार्क स्ट्रीट इंडियन म्युझियममध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. उपस्तित असणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सीआयएसएफ जवानाने एके 47 रायफलने 20 ते 25 राऊंड फायरिंग केली. या घटनेनंतर घटनास्थळावर कोलकाता पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ त्या सीआयएसएफ जवानाला ताब्यात घेतलं. ही घटना का घडली? जवानाने गोळीबार केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस जवानाची कसून चौकशी करत आहेत.
#WATCH | Continuous firing by CISF Constable from his AK 47 in the Indian Museum CISF Barrack situated at Kolkata's Park Street. One died on spot, while another was injured. The constable who fired is still inside, Kolkata Police force deployed on spot pic.twitter.com/WqucNr0RJA
— ANI (@ANI) August 6, 2022
आणखी वाचा
Thackeray vs Shinde Case : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर, सुनावणीची पुढची संभाव्य तारीख 12 ऑगस्ट
Vice President Election Result : जयदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, धनखड यांना 528 मतं