एक्स्प्लोर
Advertisement
भारताची सीमा ओलांडून 6 किमीपर्यंत चीनची घुसखोरी
गेल्या वर्षी सिक्कीम सेक्टरच्या डोकलाममधील रस्ते बांधणीवरुन भारत आणि चीनमध्ये सुमारे 73 दिवस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा भारताच्या समजूतदारपणामुळेच डोकलाम प्रश्न सुटला होता.
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. उत्तर पेंगाँग भागात चीनने जवळपास 6 किलोमीटर घुसखोरी केली. इंडो तिबेटीनय बॉर्डर पोलिस म्हणजेच आयटीबीपीने यासंदर्भातील अहवाल भारतीय गृह मंत्रालयाला पाठवला आहे.
भारतीय जवानांनी विरोध केल्यानंतर चिनी सैन्य माघारी गेल्याचीही माहिती मिळते आहे.
आयटीबीपीच्या अहवालानुसार, चिनी सैन्याने उत्र पेंगाँग तलावाजवळ गाड्यांच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी, 7 मार्च आणि 12 मार्च 2018 या तीन दिवशी घुसखोरी केली. भारतीय भूभागात सहा किलोमीटरपर्यंत चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचेही आयटीबीपीने अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील असाफिलामध्ये भारताने ‘आक्रमण’ केल्याचे चीनने म्हटले बीपीएमच्या बैठकीत म्हटले होते. यावेळी ‘आक्रमण’ शब्दाला भारताने आक्षेप घेतला.
गेल्या वर्षी सिक्कीम सेक्टरच्या डोकलाममधील रस्ते बांधणीवरुन भारत आणि चीनमध्ये सुमारे 73 दिवस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा भारताच्या समजूतदारपणामुळेच डोकलाम प्रश्न सुटला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
हिंगोली
निवडणूक
Advertisement