एक्स्प्लोर

चीनकडून पुन्हा सीमेवर सैन्याची जमवाजमव, सॅटेलाईट इमेजमध्ये चिनी सैन्याच्या हालचाली उघड

चीनने पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव केली आहे. उपग्रहाने काढलेल्या या परिसराच्या फोटोनुसार, चीनने या परिसरात एक तळ उभारला आहे. चीनी सैन्याचा हा तळ गलवान खोऱ्यात जिथे भारत आणि चीन यांच्यात झटापट झाली त्याच ठिकाणी असल्याचं स्पष्ट दिसतं.

नवी दिल्ली : चीनने पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव हा कराराचा भंग असल्याचा आरोप भारताने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताने हा चीनच्या सीमेवरील सैन्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या जमवाजमवीला हरकत घेतली आहे. मागच्याच आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा झाल्या. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, असं वाटत असतानाच चीनने पुन्हा सीमेपलीकडे सैन्याची आणि युद्धसाहित्याची आवक वाढवली आहे.

रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी मिळवलेल्या उपग्रहाने काढलेल्या या परिसराच्या फोटोनुसार, चीनने या परिसरात एक तळ उभारला आहे. चीनी सैन्याचा हा तळ गलवान खोऱ्यात जिथे भारत आणि चीन यांच्यात चकमक झाली त्याच ठिकाणी असल्याचं स्पष्ट दिसतं. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रात काही तंबू दिसतात, त्याखाली काही बांधकाम सुरु असावं असा संशय रॉयटरच्या बातमीत व्यक्त करण्यात आला आहे. कारण या सॅटेलाईटद्वारे काढलेल्या या चित्रात बांधकामाच्या ठिकाणी असतात तशा भिंती आणि बॅरिकेट्स असल्याचंही दिसत असल्याचं बातमीत म्हटलं आहे.

चीन आणि भारत यांच्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LAC च्या चीनकडील बाजूला गेल्या महिनाभरापासून चीनने सैन्य आणि युद्ध साहित्याची आवक वाढवली आहे. चीन आणि भारत यांच्यातील सीमा निश्चित नसल्यामुळे चीनकडून अनेकदा भारतीय हद्दीतल्या ठिकाणांवर अतिक्रमण होत आहे.

1993 साली दोन्ही देशात झालेल्या द्वीपक्षीय करारानुसार, दोन्ही देशांना सीमेवर एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य जमा करता येत नाही.

गेल्या आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-चीन यांच्यातील सीमेवर बराच तणाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून कोणीच कोणाच्या भूमीवर आक्रमण केलं नसल्याची माहिती दिली होती. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचं चीनमधील प्रसारमाध्यमांनी स्वागत केलं.

एकूणच चीन-भारत तणावावरुन वातावरण तापलेलं आहे.

चीनने सीमेपलिकडे मोठ्या प्रमाणात सैन्य गोळा केल्यामुळे भारतानेही त्याला प्रत्युत्तर आपल्या बाजूला सैन्य जमा केलं आहे. त्यानंतर गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले तरी चीनची किती हानी झाली हे अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.

त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्हीके सिंह यांनी मात्र चीनचे सैनिकही आपल्या ताब्यात होते, मात्र आपण त्यांना सोडून दिलं असल्याची माहिती दिली.

संबंधित बातम्या

India-China Face Off | चीनची पुन्हा दगाबाजी, गलवान खोऱ्यात उभारले तंबू

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime News : नागपूरच्या मेयो रुग्णालयात पोलिसाकडून निवासी डॉक्टरला मारहाण; घटनेचा सीसीटीव्ही समोर, तरी डॉक्टरवरच गुन्हा! मार्ड संघटनेचा आक्रमक पवित्रा
नागपूरच्या मेयो रुग्णालयात पोलिसाकडून निवासी डॉक्टरला मारहाण; घटनेचा सीसीटीव्ही समोर, तरी डॉक्टरवरच गुन्हा! मार्ड संघटनेचा आक्रमक पवित्रा
Embed widget