भारत-चीन सीमावादानंतर केंद्र सरकारवरील लोकांचा विश्वास कायम, एबीपी न्यूज- सी वोटरचा सर्व्हे
भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर चीनला रोखठोक उत्तर देण्याची मागणी होत आहे. मात्र या सर्व घडामोडींनंतरही लोकांचा सरकारवरील विश्वास कायम असल्याचे एबीपी न्यूज- सी वोटरचा सर्व्हेतून समोर आलं आहे.
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हिंसक झडपेत 20 जवान शहीद झाले. त्यानंतर देशात चीनविरोधात वातावरण तयार झालं आहे. चीनला यावेळी सडेतोड उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी सर्वच स्थरातून होताना दिसत आहे. विरोधी पक्षापासून ते सामान्य जनता यावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे, असं म्हणत आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठीही प्रयत्न होत आहेत.
या सर्व तणावपूर्ण वातावरणात एबीपी न्यूज आणि सी वोटरने एक सर्व्हे केला आहे. सद्यपरिस्थितीत जनता केंद्र सरकारसोबत आहे की लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाला आहे, याबाबत एबीपी न्यूज आणि सी वोटरने एकत्रित हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत 10 हजार 500 लोकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी या सर्वांना काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांचं मत जाणून घेण्यात आलं. भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन मोठी समस्या आहे, असंही मत लोकांना नोंदवलं आहे.
प्रश्न - राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किती विश्वास ठेवता? खूप जास्त- 72.6 टक्के काही प्रमाणात - 16.2 टक्के अजिबात नाही - 11.2 टक्केप्रश्ना - भारतासाठी चीन मोठी समस्या आहे की पाकिस्तान? चीन - 68 टक्के पाकिस्तान - 32 टक्के
प्रश्न - चीनला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने योग्य पावलं उचलली का? सरकारने योग्य पावलं उचलली - 39.8 टक्के चीनला सरकारने सडेतोड उत्तर नाही दिलं - 60.2 टक्के
प्रश्न - सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात सरकारवर जास्त विश्वास आहे की काँग्रेसवर? सरकारवर जास्त विश्वास आहे - 74 टक्के विरोधी पक्षावर जास्त विश्वास आहे - 17 टक्के कोणावरही विश्वास नाही - 9 टक्के
प्रश्न - चीनच्या विरोधात देशातील लोक चीनी सामानावर बहिष्कार टाकतील का? होय - 68 टक्के नाही - 32 टक्के
प्रश्न - राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्यावर किती विश्वास आहे? खूप जास्त - 14 टक्के काही प्रमाणात - 25 टक्के काहीच विश्वास नाही - 61 टक्के
संबंधित बातम्या
- India-China Face Off | चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद
- India-China Face Off | कर्नल संतोष बाबूंसह 20 जवान शहीद; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
- India-China Border Dispute | चीनने LAC ची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला : पराराष्ट्र मंत्रालय
- IndiavsChina | तब्बल 45 वर्षानंतर भारत चीन सीमेवर रक्त सांडलं, महिनाभरापासून धुमसत्या वादाचा स्फोट