एक्स्प्लोर

India-China | सीमाभागात ना घुसखोरी झाली, ना कोणती पोस्ट दुसऱ्याच्या ताब्यात : पंतप्रधान मोदी

भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर एलएसीवर तणाव आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावेळी आपल्या एक इंच जमिनीकडे कोणी डोळे वर करुन पाहू शकत नाही, एवढी क्षमता आज आपल्याकडे असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले. डेप्लॉयमेंट, कारवाई आणि प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी जे करायला हवं ते आपलं सैन्य करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर एलएसीवर तणाव आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात ते बोलत होते.

भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता बैठकीला सुरुवात झाली. या व्हर्च्युअल बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि नेते सहभागी झाले आहेत.

कोणताही भारतीय सैनिक ताब्यात नसल्याचे चीनकडून स्पष्ट; भारतानंतर चीनकडूनही 'त्या' बातमीचं खंडन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातील महत्वाचे मुद्दे

  • आपल्या एक इंच जमिनीकडे कोणी डोळे वर करुन पाहू शकत नाही, एवढी क्षमता आज आपल्याकडे आहे.
  • आज भारतीय लष्कर वेगवेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी लढण्यास सक्षम आहे.
  • मागील काही वर्षात सीमा भाग सुरक्षित करण्यासाठी बॉर्डर भागात मोठ्या प्रमाणात इंफ्रास्ट्रक्चर उभारण्यास प्राथमिकता दिली आहे.
  • आपल्या लष्कराची गरज असलेले लढाऊ विमान, आधुनिक हेलीकॉप्टर, मिसाइल डिफेन्स सिस्टम इत्यादीवर आपण भर दिला आहे.
  • नवीन इंफ्रास्ट्रक्चरमुळे खासकरुन LAC मध्ये आपली पेट्रोलिंग करण्याची क्षमता वाढली आहे.
India China Face off |चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची अखेर सुटका! सरकारचं मात्र घटनेवर मौन
  • पेट्रोलिंग वाढल्यामुळे सावधानता वाढली आहे आणि LAC वर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे. ज्या भागांवर पूर्वी जास्त लक्ष ठेवता येत नव्हतं त्या ठिकाणीही आपले जवान चांगल्या पद्धतीने मॉनिटर करत आहेत.
  • आतापर्यंत ज्यांना कोणी विचारत नव्हते, रोखत नव्हते, त्यांनी आता टप्प्याटप्यावर आपले सैनिक रोखत आहेत. त्यामुळे तनाव वाढत आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे सरकारला रोखठोक प्रश्न
  • चिनी सैनिकांनी कोणत्या तारखेला लडाखमध्ये आपल्या सीमाभागात घुसखोरी केली.
  • सरकारला घुसकोरी केल्याचं कधी कळालं? 5 मे रोजी याची माहिती मिळाली की त्या आधी?
  • सरकारला नियमितपणे आपल्या देशाच्या सीमाभागातील सॅटेलाइटद्वारे घेतलेली छायाचित्र मिळत नाही का?
  • आपली गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे सरकाला वाटते का?
सीमावाद मुत्सद्दीपणाने हाताळायला हवा : शरद पवार गेल्या काही दशकापासून चीन त्यांच्या लष्कराची ताकद वाढवत आहे. लडाख भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य हाती घेतले आहे. पूर्व लडाख सीमा भागात चीनने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात चीन त्यांची ताकद वाढवत आहे. गलवान खोऱ्यातील मोठा भूगाग चीनने व्यापला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा वाद मिटवायचा असेल तर हा विषय मुत्सद्दीपणाने हाताळण्याचा सल्ला राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. PM Modi calls meeting | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget