(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajnath in Russia | चीनसोबतच्या तणावपूर्ण संबंधांनंतरही रशिया भारताला शस्त्रात्र पुरवणार
चीनसोबतच्या तणावपूर्ण संबंधानंतरही रशियाने भारताला शस्त्रास्त पुरवणार असल्याचं आश्वासन दिलं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली : सध्या भारत आणि चीन यांच्यात तणावाचं वातावण निर्माण झालं आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हिंसक झडपेत 20 जवान शहीद झाले. त्यानंतर देशात चीनविरोधात वातावरण तयार झालं आहे. चीनसोबत तणाव वाढलेला असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, 'मला रशियाच्या वतीने आश्वासन देण्यात आलं आहे की, जे करार करण्यात आले आहेत, ते कायम ठेवण्यात येतील. तसंच बऱ्याच बाबींमध्ये ही कामं लवकरच पूर्ण केली जातील. आपल्या सर्व प्रस्तावांना रशियाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मी रशिसोबत झालेल्या चर्चेमुळे पूर्णपणे संतुष्ट आहे.'
चीनसोबतचे संबंध ताणलेले असतानाच भारत एस-400 मिसाइल रशियाकडून लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी यावर्षी फेब्रुवारीत लखनऊमध्ये डेफएक्सपो 2020 दरम्यान 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ज्यामध्ये जमीन, हवाई आणि नौदल प्रणालींचा समावेश आहे आणि हायटेक सिव्हिलियन वस्तूंचा विकास उत्पादनांमध्ये समावेश करण्यात आला. भारताच्या वतीने 200 कोमोव-226T हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची योजना आहे.
भारतीय वायुसेनेने आर-27 एअर-टू-एअर क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी रशियासोबत 1500 कोटी रुपयांचा सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. ही क्षेपणास्त्र भारतीय वायुसेनेच्या मल्टी रोल सू-30 एमकेआई फायटर जेट्सवर फिट करण्यात येणार आहेत. चीनसोबत तणाव वाढलेला असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. रशियाकडून हवी असलेली S-400 ही अँटी मिसाईल सिस्टीम डोळ्यासमोर ठेऊन राजनाथ सिंह हे तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियात सोहळा आहे दुसऱ्या महायुद्धाच्या पंचाहत्तरीचा. त्याला चीनच्या संरक्षणमंत्र्यांनाही आमंत्रण आहे. पण भारतासाठी या दौऱ्यात एकच ध्येय असेल ते म्हणजे एस-400 रशियाकडून लवकरात लवकर मिळवणं.
दरम्यान, 2018 मध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे भारतात आले होते. त्याचवेळी S-400 या अँटी मिसाईल सिस्टीमच्या खरेदीबाबत करार झाला होता. हवाई बचावाची सर्वात आधुनिक सिस्टीम मानली जाते. हा करार होऊ नये यासाठी अमेरिकेचा मोठा दबाव त्यावेळी भारतावर होता.खरंतर चीन आणि रशियाचे लष्कही संबंधही मधुर राहिले आहेत. चीनला अनेक महत्त्वाची शस्त्रास्त्रं रशियाकडूनही मिळालेली आहेत. आता ज्या S-400 ची भारत वाट पाहतोय, ते चीनला रशियाकडून याच्याआधीच मिळालेलं आहे.
पाहा व्हिडीओ : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर रवाना
काय आहे S-400 अँटी मिसाईल सिस्टीम? - या सिस्टीमवरुन चार प्रकारचे मिसाईल एकाचवेळी डागले जाऊ शकतात. - कमीत कमी शंभर फूट ते जास्तीत जास्त 45 हजार फुटावरचं कुठलंही लक्ष्य भेदण्याची क्षमता - रडारपासून वाचण्याची क्षमता, कुठल्याही पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक जाम होणार नाही याची खात्री - अडीचशे किलोमीटर पर्यंत अचूक निशाणा लावण्याची क्षमता
महत्त्वाच्या बातम्या :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना, चीनसोबतच्या तणावानंतर दौऱ्याला महत्त्व
भारत-चीन सीमावादानंतर केंद्र सरकारवरील लोकांचा विश्वास कायम, एबीपी न्यूज- सी वोटरचा सर्व्हे