सावधान! भारतावर चीन सायबर हल्ला करण्याची शक्यता! अनोळखी ईमेल उघडू नका
सीमावादानंतर चीन आता भारतावर सायबर अॅटक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. उद्यापासून (21 जून) हा हल्ला होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : चीनच्या कुरापती काही थांबायच्या नाव घेताना दिसत नाही. भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनने आता भारताविरुद्ध नवे हत्यार उपसले आहे. हे हत्यार आहे सायबर अॅटकचे. सुत्रांच्या माहितीनुसार चीन भारतावर 21 जुनपासून सायबर अॅटक करण्याच्या तयारीत आहे. हा हल्ला इमेलच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अॅटक ncov2019.gov.in या ईमेल मधून होण्याची शक्यता आहे. या ईमेलचा विषय 'Free Covid 19 Test' असा असू शकतो.
चीनी सायबर अॅटक वाचण्यासाठी या ईमेल वरुन आलेली अॅटचमेंट उघडू नका. भारतातील 20 लाख लोकांचे ईमेल टारगेट वर असल्याची माहिती मिळत आहे. खासगी आणि आर्थिक ईमेल वर हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे. काही दिवासांपूर्वी ऑस्ट्रेलिया वर देखील अशाच प्रकारचा सायबर अॅटक झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर दोन-चार वेबसाईटवर नजर ठेवली जात आहे. माहितीनुसार, चीन हॅकर्स या सायबर हल्ल्याच्या तयारीला लागले आहे.
सायबर एक्सपर्टला काय वाटतं? सायबर एक्सपर्ट पवन दुग्गल यांनी एबीपी न्यूजला सांगितले, की या इशाऱ्याला दुर्लक्षित करू नका. जर तुम्हाला अनोळखी संदेश आला, ज्यात एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले असेल तर असे करू नका. तुम्हाला एखादा मेल आला, ज्यात एखादी अॅटचमेंट असेल तर ती डाऊनलोड करू नका. कोरोना संकट काळात असे सायबर हल्ले वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सायबर सुरक्षेबद्दल आपण जागरुक राहणे गरजेचे आहे. याला आपल्या जीवनशैलीचा भाग करुन घ्यायला हवे.
India-China Face off | चिनी घुसखोरी नाही, मग जवानांचं हौतात्म्य कशानं? गलवान खोऱ्यात नेमकं काय घडलं?