एक्स्प्लोर
औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात विक्रेत्यांचा देशव्यापी संप

ठाणे : ऑनलाईन फार्मसीला विरोध करत देशभरातील औषध विक्रेत्यांनी उद्या (30 मे) संप पुकारला आहे. यात ठाण्यातले 5 हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.
ई-फार्मसीसाठी औषध विक्रेत्याला सरकारदरबारी नोंदणी करावी लागणार असून औषधांच्या किंमतीची एक टक्का रक्कम सरकारला जाणार आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसेल तसंच झोपेच्या गोळ्या, ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधंही सगळ्यांना सहज उपलब्ध होण्याचा धोका आहे.
ई फार्मसीमुळे देशातल्या आठ लाख औषध विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे सरकारनं ई फार्मसीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जाते आहे.
या बंदनंतरही जर सरकारनं दखल घेतली नाही, तर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचा इशारा केमिस्ट असोशिएशन ऑफ ठाणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
