एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्याविरोधातील आरोपपत्र सादर
या प्रकरणी 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा तरुण तेजपाल यांनी केला, अशी माहिती सरकारी वकील फ्रान्सिस्को तबोरा यांनी दिली.
पणजी : बलात्कार प्रकरणी ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्याविरोधातील आरोप निश्चित करण्यात आलं आहेत. तरुण तेजपाल यांना त्यांच्याविरोधात निश्चित करण्यात आलेल्या आरोपांची माहिती देण्यात आली. मात्र आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा तरुण तेजपाल यांनी केला, अशी माहिती सरकारी वकील फ्रान्सिस्को तबोरा यांनी दिली.
या प्रकरणी 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा येथील बांबोळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला सहकाऱ्याचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुण तेजपाल यांच्यावर आहे. या प्रकरणी तरुण तेजपाल यांना अटक झाली होती. प्रकरण उघडकीस येताच तरुण तेजपाल यांना ‘तहलका’ मासिकाचं संपादकपद सोडावं लागलं होतं.
तरुण तेजपालविरोधात आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे असल्याचा दावा गोवा पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे. पोलिसांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं होतं.
दरम्यान हे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा तरुण तेजपाल यांनी केला. याविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टातही धाव घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement