Chandrayaan-3 Live Tracking : चांद्रयान-3 ची चंद्रावर लँडिंग लाईव्ह पाहा, येथे होणार थेट प्रक्षेपण; उरले फक्त काही तास
ISRO Chandrayaan-3 Position, Location, Landing Status : विक्रम लँडर आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. चांद्रयान-3 आता कुठे आहे, हे लाईव्ह अपडेट कसं आणि कुठे पाहता येईल जाणून घ्या.
श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम (ISRO Moon Mission) आता अंतिम टप्प्यावर आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या लँडिंगसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. विक्रम लँडरचा हळूहळू वेग आणि अंतर कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने सांगितलं आहे की, चांद्रयान-3 ने ठरल्याप्रमाणे आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यामुळे यापुढील टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करेल, अशी आम्हाला खात्री आहे.
इस्रो चांद्रयान-3 चं लाइव्ह ट्रॅकिंग
चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर चांद्रयान-3 चं विक्रम लँडर उतरणार आहे. चांद्रयान-3 च्या चंद्र मोहिमेच्या थेट प्रक्षेपणाच्या रिअल-टाइम अपडेटसाठी इस्रोने खास तयारी केली आहे. ज्यामुळे घरबसल्या तुम्हाला चांद्रयान-3 चा चंद्रावर उतरण्याचा प्रवास पाहता येणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याच थेट प्रसारण केलं जाणार आहे. इस्रोने यासंदर्भात माहिती दिली आहे.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 22, 2023
The mission is on schedule.
Systems are undergoing regular checks.
Smooth sailing is continuing.
The Mission Operations Complex (MOX) is buzzed with energy & excitement!
The live telecast of the landing operations at MOX/ISTRAC begins at 17:20 Hrs. IST… pic.twitter.com/Ucfg9HAvrY
चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण
भारत अवघ्या काही तासांमध्ये इतिहास रचणार आहे. भारत चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. घरबसल्यास आपल्या सर्वांना हा अभिमानाचा क्षण अनुभवता येणार आहे. इस्रोकडून चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. लँडिंग ऑपरेशन्सचं लाईव्ह प्रक्षेपण MOX/ISTRAC कडून 23 ऑगस्ट रोजू 17:20 वाजता सुरू होणार आहे.
चांद्रयान-3 चंद्रावर कधी उतरणार?
चांद्रयान-3 चं 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. यानंतर आता चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल. इस्रोने ताज्या दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
संबंधित इतर बातम्या :