एक्स्प्लोर

LPG e-KYC: घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस

LPG e-KYC: पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. गॅस एजन्सीमध्ये जाण्याची गरज नाही.

LPG e-KYC: पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (eKYC) अनिवार्य केले आहे. गॅस एजन्सीमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही संबंधित ऑईल कंपनीचे अधिकृत ॲप आणि 'Aadhaar FaceRD' ॲप वापरून घरबसल्या ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करू शकता. यामुळे तुमची गॅस सबसिडी विनाव्यत्यय सुरू राहील. 

घरगुती LPG ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आले असून, पेट्रोलियम मंत्रालयाने बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाद्वारे हे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया Indane, Bharat Gas किंवा HP Gas च्या मोबाइल ॲपद्वारे मोफत आणि घरबसल्या करता येते. यामुळे सबसिडी सुरू राहण्यास मदत होईल आणि गॅस पुरवठ्यातील अडचणी दूर होतील. ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. सबसिडी मिळवण्यासाठी आणि गॅस सिलिंडर मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी हे करणे आवश्यक आहे. मोबाईलवर काही मिनिटांतच ही प्रक्रिया पूर्ण करता येते.  

ई-केवायसी (e-KYC) कशी करावी? (How To eKYC Of Gas)

  1. ॲप डाउनलोड करा: तुमच्या गॅस कंपनीचे (Indane, Bharat, HP) मोबाइल ॲप किंवा UMANG ॲप डाउनलोड करा.
  2. लॉगिन करा: मोबाईल नंबरद्वारे ॲपमध्ये लॉगिन करा.
  3. आधार प्रमाणीकरण: e-KYC किंवा 'आधार प्रमाणीकरण' पर्यायावर क्लिक करा.
  4. चेहरा स्कॅन (Face Authentication): Aadhaar FaceRD ॲप वापरून तुमचा चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.
  5. पर्यायी पद्धत: तुम्ही गॅस एजन्सीवर जाऊनही केवायसी फॉर्म भरू शकता.

ग्राहकांनी ई-केवायसी न केल्यास काय होईल? (e-KYC Process Gas)

ग्राहकांनी जर केवायसी पूर्ण केले नाही, तर तुमचे गॅस बुकिंग प्रक्रिया केली जाणार नाही आणि कंपनी तुमची डिलिव्हरी रद्द करू शकते. शिवाय, सबसिडी ट्रान्सफर समस्याप्रधान असेल आणि तुम्हाला सिलेंडरची संपूर्ण रक्कम भरावी लागेल, ज्यामुळे ₹300 ते ₹400 पर्यंतचा सबसिडीचा फायदा गमावला जाईल. केवायसी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचे कनेक्शन ब्लॉक किंवा निलंबित केले जाऊ शकते. त्यामुळे तुमची गॅस सबसिडी विनाव्यत्यय सुरू राहण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

गॅसच्या तुटवड्यानंतर सायबर चोरट्यांकडून फसवणूक- (Crime News)

गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक आदीच त्रस्त असताना, लोकांना फोन करून हे सायबर चोरटे लक्ष करत आहेत, याबाबत मुंबई पोलिसांकडे असंख्य अशा तक्रारीप्राप्त झाल्या असून अज्ञातांविरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. लोकांना Mahanagar Gas Limited (MGL) चे प्रतिनिधी असल्याचे सांगून फोन कॉल किंवा APK फाईल्स व्हाॅट्सअॅपवर पाठवत आपल्या गॅसचे बिल अद्याप भरलेले नसल्याचे सांगून तात्काळ बिल न भरल्यास गॅस कनेक्शन कट करण्याबाबत भिती घालत आहेत. तसेच मोबाइलवर पाठवलेली लिंक ओपन करण्यास सांगून क्षणार्धात त्यांच्या खाते साफ करत आहेत. काही प्रकरणांमध्ये कुटुंबांनी लाखो रुपयांची जमापुंजी गमावली असून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवर मोठा परिणाम झाला आहे.

राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही- (Maharashtra Goverment On LPG Cylinder)

महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी सुमारे 9000 मेट्रिक टन एलपीजी ची मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रिफायनरीमधील एलपीजी उत्पादन वाढविण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन 9000 मेट्रिक टनांवरून 11,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आले आहे.  त्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घरगुती गॅसची मागणी पूर्ण करण्याइतके पुरेसे उत्पादन आणि साठा उपलब्ध आहे. व्यावसायिक एलपीजीच्या बाबतीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार रुग्णालये, शाळांमधील मध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा, सामुदायिक स्वयंपाकगृहे (कम्युनिटी किचन), तसेच शासकीय शाळा व महाविद्यालयांच्या मेस यांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यात येत आहे.  उपलब्ध उत्पादनातून या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात. घरगुती वापरासाठीच्या पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) चा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधनाच्या बाबतीतही राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून दररोज सुमारे 15,000 किलो लिटर पेट्रोल आणि 38,000 किलो लिटर डिझेल या मागणीची पूर्तता केली जात आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांनी  काळजी करू नये असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Rohit Pawar: '...पण आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करता हे विसरु नये'; आमदार रोहित पवारांचा थेट मंत्री शिवेंद्रराजेंना सल्ला
'...पण आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करता हे विसरु नये'; आमदार रोहित पवारांचा थेट मंत्री शिवेंद्रराजेंना सल्ला
Chhagan Bhujbal: नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'
नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Embed widget