एक्स्प्लोर

Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत

Iran America war unemployment: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आता भारतासमोर आणखी एक नवीन संकट उभे राहिले आहे. आखाती देशांमध्ये कामाला असणाऱ्या भारतीयांच्या नोकऱ्या जाणार

Iran America war unemployment: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आखाती देशांमधून होणारा खनिज तेलाचा (Crude Oil) आणि नैसर्गिक वायूचा (Natural Gas) पुरवठा थांबल्याने जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. अशातच आता या युद्धामुळे भारताला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. इराण-अमेरिका (Iran America War) युद्धामुळे आखाती देशांमधील (Gulf Countries) अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी याठिकाणी कामाला असणारे भारतीय कामगार बेरोजगार होण्याची दाट शक्यता आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, अरब देशांमधले 15 हजार भारतीय कामगारांच्या नोकऱ्या कायमच्या जाण्याची शक्यता आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदी अरेबिया आणि युएईमध्ये पुढल्या महिन्यांपासून काम नाही. परिणामी भारतीय कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. युद्धामुळे विमानसेवा बंद असल्याने हे कामगार आखाती देशांमध्येच अडकून पडले आहेत. भारतीय कामगारांना परत येण्यासाठीही पर्याय नाही. भारतात परत येण्यासाठी पर्यायी हवाई मार्गाचा पर्याय असला तरी विमानांची तिकीटे कामगारांच्या आवाक्याबाहेर  आहेत. त्यामुळे या कामगारांना मायदेशी परतणेही शक्य नाही. नोकरी बंद असल्याने आखाती देशांमध्ये आता पुढचे दिवस कसे काढायचे, या चिंतेपोटी हे कामगार आणि त्यांच्या भारतातील कुटुंबीयांना काय करायचे, हा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी  लांबले तर केंद्र सरकार भारतीय कामगारांना विमानाने परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवणार का, हे बघावे लागेल.

Jobs in Gulf countries: आखाती देशांत भारतीय कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या करतात?

आखाती देशांतील भारतीय केवळ मजुरीच करत नाहीत, तर तेथील अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक स्तरात महत्त्वाचे योगदान देतात. 

अकुशल आणि निमकुशल मजूर (Blue-collar workers): बांधकाम क्षेत्र (Construction), तेल आणि वायू खाणी, ड्रायव्हिंग, स्वच्छता कामगार आणि घरगुती मदतनीस.

कुशल व्यावसायिक (Skilled Professionals): आयटी तज्ज्ञ, इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स आणि बँकिंग/फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञ.

आरोग्य सेवा: मोठ्या प्रमाणावर भारतीय नर्स, डॉक्टर्स आणि लॅब टेक्निशियन तिथे कार्यरत आहेत.

सेवा क्षेत्र: हॉटेल मॅनेजमेंट, रिटेल स्टोअर्स, विक्री (Sales) आणि लॉजिस्टिक क्षेत्रात भारतीयांचा मोठा वाटा आहे.

Indian workers in Gulf: आखाती देशांमध्ये भारतातील कोणत्या राज्यातील सर्वाधिक कामगार?

ऐतिहासिकदृष्ट्या केरळ हे राज्य आघाडीवर होते, परंतु अलीकडच्या काळात उत्तर भारतीय राज्यांचा टक्का वेगाने वाढला आहे.

१. उत्तर प्रदेश: सध्या आखाती देशात सर्वाधिक लोक उत्तर प्रदेशातून जातात.
२. बिहार: अकुशल मजुरांच्या स्थलांतरात बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे.
३. केरळ: अजूनही कुशल आणि आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळासाठी केरळ महत्त्वाचे आहे.
४. तामिळनाडू आणि राजस्थान: या राज्यांतूनही मोठ्या संख्येने लोक आखाती देशांत स्थलांतरित होतात.

* देशनिहाय भारतीयांची संख्या (२०२५-२६ अंदाजित)आखाती देशांत (GCC) एकूण सुमारे 90 लाख ते 1 कोटी भारतीय वास्तव्य करतात. अधिकृत आकडेवारीनुसार प्रमुख देशांतील संख्या खालीलप्रमाणे 

संयुक्त अरब अमिराती (UAE)४३ लाख 
सौदी अरेबिया २७ लाख 
कुवेत१० लाख 
ओमान ८.३ लाख 
कतार ६.८ लाख 
बहरीन ३.२ लाख

Middle East Conflict 2026: युद्धामुळे भारतीय कामगारांवर काय परिणाम होणार?

2026 च्या सुरुवातीला मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे (विशेषतः इस्रायल-इराण संघर्षाचा विस्तार) भारतीयांवर खालील परिणाम झाले आहेत.  सुरक्षेची चिंता: युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक भारतीय कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः विमानसेवा विस्कळीत झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत मायदेशी परतणे कठीण झाले आहे.

आर्थिक फटका: वाढत्या महागाईमुळे आणि तेल किमतीतील चढउतारामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. टॅक्सी ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या कमाईत घट झाली आहे.

रेमिटन्स (Remittance): भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या परकीय चलनात (Remittances) १०-२०% घट होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

परतण्याची ओढ: भारतीय दूतावासांनी 'वॉर रूम' स्थापन केल्या असून, जे भारतीय मायदेशी परतण्यास इच्छूक आहेत त्यांच्यासाठी विशेष ट्रान्झिट व्हिसा (सौदी मार्गे) आणि मर्यादित उड्डाणांची सोय केली जात आहे.

आणखी वाचा

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यावर्षी किती वाढणार दर?
29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यावर्षी किती वाढणार दर?
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
चीनच्या बाजारपेठांमध्ये 'मेड इन इंडिया'ची क्रेझ, अमेरिकेला झटका देत चीन ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, निर्यातीत मोठी वाढ
चीनच्या बाजारपेठांमध्ये 'मेड इन इंडिया'ची क्रेझ, अमेरिकेला झटका देत चीन ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, निर्यातीत मोठी वाढ
Gold Silver Price Today: 10 ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या पार; चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
10 ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या पार; चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Sangli Crime News: किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
Hardik Pandya Jasprit Bumrah MI vs PBKS IPL 2026: तुझ्यानुसार नव्हे माझ्यानुसार...हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद; नेमकं काय घडलं?
तुझ्यानुसार नव्हे माझ्यानुसार...हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद; नेमकं काय घडलं?
Embed widget