Chandrayaan-3 : चांद्रयान-3 शोधतंय लँडिंगसाठी सुरक्षित जागा, उरले फक्त 48 तास; इस्रोकडून लँडिंगसाठी तयारी पूर्ण
ISRO Moon Mission : चांद्रयान-3 चं विक्रम लँडर सध्या कॅमेऱ्याद्वारे सुरक्षित लँडिंगसाठी जागा शोधत आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेचे फक्त 48 तास उरले आहेत.
श्रीहरीकोटा : सध्या भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 (Chandrayaan-3) कडे लागलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) ने चांद्रयान-3 बाबत नवीन अपडेट शेअर केली आहे. भारत चांद्रयान-2 मोहिमेनंतर चार वर्षांनी पुन्हा एकदा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. चांद्रयान-3 चं विक्रम लँडर सध्या कॅमेऱ्याद्वारे सुरक्षित लँडिंगसाठी जागा शोधत आहे.
चांद्रयान-3 शोधतंय लँडिंगसाठी सुरक्षित जागा
इस्रोने सांगितलं की, 'चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांची चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. सध्या विक्रम लँडर कॅमेऱ्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचं मॅपिंग करत चांद्रयान-3 उतरवण्यासाठी सुरक्षित जागा शोधत आहे, जिथे विक्रम लँडरमधील रोव्हर संभाव्य धोका टाळून सुरक्षितरित्या चंद्रावर उतरू शकेल.'
चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 चा एकमेकांशी संपर्क
इस्रोची चांद्रयान-2 अयशस्वी ठरली तरी, चांद्रयान-2 चं ऑर्बिटर अद्यापही अवकाशात आहे. चांद्रयान-2 चं ऑर्बिटर चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे. आता चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ गेल्यावर आता त्याचा संपर्क आधीच अवकाशात असलेल्या चांद्रयान-2 सोबत झाला आहे. दोन अंतराळयानांमध्ये संपर्क प्रस्थापित झाला आहे. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
उरले फक्त 48 तास
चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आता फक्त 48 तास उरले आहेत. चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी इस्रोने तयारी पूर्ण केली आहे. महत्त्वाचं म्हणजे चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 चा संपर्क झाला आहे. चंद्राला प्रदक्षिणा घालत असलेल्या चांद्रयान-2 ने चांद्रयान-3 चं स्वागत केलं आहे. इस्रोने (ISRO) ने 21 ऑगस्ट रोजी माहिती दिली की, चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरशी चांद्रयान-3 यानाचा यशस्वीरित्या संपर्क झाला आहे. चांद्रयान-2 चं ऑर्बिटर आणि चांद्रयान-3 चं विक्रम लँडर यांच्यात यशस्वीरित्या संपर्क झाला आहे. दोघांमध्ये संवादही झाला आहे.
चांद्रयान-2 कडून चांद्रयान-3 चं चंद्राच्या कक्षेत स्वागत
चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चांद्रयान-3 चे चंद्राच्या कक्षेत स्वागत केलं आहे. रविवारी चांद्रयान-3 चंद्रापासून 25 किलोमीटर अंतरावर होतं. आता चांद्रयान-3 चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत त्याच्या आणखीजवळ जात आहे. प्रत्येक क्षणाला चंद्रापासून चांद्रयानचे अंतर आणि वेग कमी होत आहे. पुढील 48 तासांत चांद्रयान-3 चा वेग आणखी कमी होईल आणि ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :