एक्स्प्लोर

2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अधिपत्याखाली असलेल्या MIDC विभागाचं खोटं लेटरहेड वापरुन बोगसपणे पासवाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी विधानभवनात (Vidhansabha) प्रवेश देण्याच्या पासेसचे नियम अधिक कडक करण्यात आले. तसेच, आमदार सदस्य, मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांशिवाय नियमानुसारच पासचे वाटप करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते. मात्र. एमआयडीसीच्या लेटरहेडची हुबेहूब रंगीत झेरॉक्स वापर करून बोगस प्रवेशपत्रे वापरुन काहींना प्रवेश देण्यात आल्याचा मुद्दा आज विधानसभेत गाजला. विशेष म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनीच हा मुद्दा उपस्थित करत चक्क 2000 ते 5000 रुपयांपर्यंत पैसे घेऊन विधानसभेचे पासेस दिल्याची तक्रार त्यांनी सभापतींकडे केली. विशेष म्हणजे यापूर्वीही पैसे घेऊन विधानसभेचे पास दिले जात असल्याचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित झाला होता, तरीही पुन्हा तेच समोर आलं आहे. 

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अधिपत्याखाली असलेल्या MIDC विभागाचं खोटं लेटरहेड वापरुन बोगसपणे पासवाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खोट्या लेटरहेडवर विभागातील अधिकाऱ्यांची नावे घालून खोट्या सह्या केल्याचा प्रकार घडला आहे. काही शिपायांनी 50 पास दिले असून त्यासाठी 2000 ते 5000 रूपये घेतले गेल्याची माहिती स्वत: उदय सामंत यांनीच दिली. यासंदर्भात त्यांनी सभापतीकडे तक्रारही केली आहे. सभापती राम शिंदे यांनी यावर चौकशी समिती नेमून त्यात दोषी असलेल्या लोकांवर अधिवेशन संपेपर्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, याप्रकरणी एसआयडीसीच्या अहवालाअंती निर्णय घेऊ, असे गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) पंकज भोयर यांनी सांगितले. 

अमोल मिटकरींचाही सवाल

विशेष म्हणजे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन एंट्री पासेस संदर्भात प्रश्न उपस्थि केला होता. विधानभवन परिसर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या बातम्या आल्याने विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्यानंतर देखील काही संघटनेचे कार्यकर्ते आत दिसले, दुपारी सभागृहात एका दालनात यथेछ्य जेवले, अधिवेशन काळात पूर्णवेळ पासेसही मिळवल्या व विशिष्ट प्रकारची पुस्तके विधीमंडळ परिसरात वाटली. आता प्रश्न असा की कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पासेस पुर्णपणे बंद असताना देखील काही विशिष्ट प्रचारक आत आले कसे? हे कोण यांचा शोध घेण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला होता.

बॉम्बेची अफेवेनंतर कडक नियम

दरम्यान, मुंबई विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल पाठवल्याने तीन दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली होती. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधानभवन परिसरात सर्च आपरेशन सुरू केले. मात्र, थोड्या वेळेनंतर सुरक्षा रक्षकांनी तपासणी केल्यानंतर ही अफवा आणि फेक मेल असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या घटनेनंतर विधानभवन परिसरात एंट्रीचे नियम कडक करण्यात आले होते. तरीही, खोट्या लेटरहेडचा वापर करुन चक्क 50 पास बोगसपणे दिल्याने पुन्हा एकदा विधानसभा एंट्री पास आणि सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. 

हेही वाचा

धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

Embed widget