एक्स्प्लोर

अधिकारी नवऱ्याचे भाजप आमदार पत्नीला पत्र; माझा फोटो वापरू नका, तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या

फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये वृत्तपत्र जाहिरात आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांचे पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही छायाचित्र झळकले.

संभाजीनगर : पत्नी पुढारी पण पती कारभारी अशीच परिस्थिती सहसा ग्रामीण भागात पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील (Election) महिला आरक्षणाचा फायदा घेत अनेक महिला सरपंचपदावर विराजमान झाल्या. मात्र, या गावचा कारभार आजही त्यांचे पतीचा पाहतात असे काहीसे चित्र सर्रास दिसून येते. तर, अनेकदा आमदार पत्नीच्या पतींकडेही अशीची जबाबदारी असते. तुलनेने हे प्रमाण कमी असते. मात्र, पत्नी आमदार असल्यावर पतीचे फोटोही विविध कार्यक्रमात झळकत असतात. आता, संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील भाजप (BJP) आमदार पत्नीला अधिकारी असलेल्या पतीने पत्र लिहून माझे फोटो वापरु नका, तशा सूचना तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, असे म्हटले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये वृत्तपत्र जाहिरात आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांचे पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही छायाचित्र मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याचे समोर आलं. अनुराधा चव्हाण यांचे पती अतुल चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता आहेत. अतुल चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी आणि आमदार असलेल्या अनुराधा चव्हाण यांना थेट पत्र लिहून कार्यकर्त्यांना आवरण्याची मागणी केली आहे. “आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माझा फोटो वापरणे थांबवावे आणि माझे नाव किंवा छायाचित्र पक्षाच्या बॅनरवर किंवा जाहिरातीवर टाकणं टाळावे,” अशी स्पष्ट विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. अधिकारी असलेल्या चव्हाण यांच्या पत्रामुळे फुलंब्री मतदारसंघात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीच्या या संवादाला प्रशासनिक आचारसंहितेचा संदर्भ मिळत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय (Letter to MLA wife)

''उपरोक्त विषयी सादर करण्यात येते की, आपल्या फुलंब्री मतदार संघातील आपले कार्यकर्ते हे माझे (अतुल भि. चव्हाण) छायाचित्र (फोटो) विविध वृत्तपत्रात तसेच बॅनरवर प्रसिध्द करत आहेत. त्यामुळे माझ्या विरुध्द तक्रारी तसेच माहिती अधिकार अर्ज या कार्यालयास प्राप्त होत आहेत. तरी, आपणांस विनंती करण्यात येते की, माझे छायाचित्र (फोटो) विविध वृत्तपत्रात तसेच बॅनरवर प्रसिध्द न करण्याबाबत आपल्यास्तरावरुन आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांना सुचना देण्यात याव्यात, अशी आपणांस विनंती आहे.'', असा आशय अतुल चव्हाण यांनी आमदार पत्नीला लिहिलेल्या पत्रात आहे.

हेही वाचा

तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget