एक्स्प्लोर

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर? कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या आशिया कपचे नियम

IND vs PAK Rain Chances: भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये जर पाऊस पडला तर त्यासाठी आशिया कपचे काही खास नियम आहेत. त्या नियमांच्या आधारे विजेता ठरवण्यात येणार आहे.

मुंबई : आशिया कपमधील (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तानमधील हाय होल्टेज अंतिम लढत (India vs Pakistan) रविवारी होणार असून त्या सामन्याकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागलं आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. विशेष म्हणजे, एशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे. भारताने याआधी ग्रुप स्टेज आणि सुपर-4 दोन्ही सामन्यांत पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. त्यामुळे अंतिम सामन्याच्या माध्यमातून दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत.

या सामन्यादरम्यान दर पाऊस पडला तर काय? पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर कोण विजेता ठरणार? या प्रश्नाचं उत्तर आशिया कपच्या खास नियमांमध्ये दडलेलं आहे.

Asia Cup 2025 Rules : पावसासाठी काय आहे नियम?

जर 28 सप्टेंबरला कोणत्याही कारणामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. त्यासाठी आशिया कप फायनलसाठी 29 सप्टेंबर राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. परंतु, जर रिजर्व डे ला देखील निकाल लागू शकला नाही, तर भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.

IND vs PAK Final Match History : भारत-पाकिस्तान फायनल इतिहास

आजवर अनेक स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात 5 फायनल सामने झाले आहेत. यापैकी 2 वेळा भारताने, तर 3 वेळा पाकिस्तानने विजय मिळवला आहे.

भारताचे विजय: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट 1985, टी20 वर्ल्ड कप 2007

पाकिस्तानचे विजय: आशिया कप 1986, शिया कप 1994, चॅम्पियन्स ट्रॉफी 2017

भारत संघाची प्लेइंग 11 - अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान संघाची प्लेइंग 11 - सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी.

दुबईची खेळपट्टी आणि अंतिम सामना

आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात ही पहिलाच वेळ आहे, जेव्हा भारत-पाकिस्तान अंतिम सामना होते आहे. दुबईची पिच फलंदाज आणि गोलंदाज, दोघांनाही साथ देऊ शकते. चाहत्यांची अपेक्षा आहे की अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांसारखे स्टार खेळाडू आपली छाप नक्कीच उमटवतील.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget