Corona Effect | सीबीएसईचा नववी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय
नवी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.
मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं की, सीबीएसईला आम्ही याआधीच अभ्यासक्रम तयार करताना यामध्ये विद्यार्थ्यांचा ताण वाढणार नाही यासाठी अभ्यासक्रम कमी करावा अशा सूचना केली होती. यासाठी शिक्षणतज्ज्ञांच्या अभ्यासक्रम कमी करण्यासाठी काही सूचना, मार्गदर्शन मागितले होते. यामध्ये दीड हजार पेक्षा जास्त सूचना याबाबत प्राप्त झाल्यात. त्यामुळे विषयांतील मुख्य कन्सेप्टला न वगळता अभ्यासक्रम तर्कसंगत तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
याबाबत सीबीएसईनेसुद्धा परिपत्रक काढून सुधारित अभ्यासक्रम आणि कमी केलेला अभ्यासक्रम याबाबत माहिती दिली आहे. या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्लास रूम टीचिंग होत नसल्याने होत असलेल्या नुकसानाचा विचारात करता त्याची भरपाई करता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोर्स कमिटीने सुधारित अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेतले आहेत. ज्यांनी सीबीएसई बोर्ड गव्हर्निंग बॉडी आणि करिक्युलम कमिटीकडून मान्यता घेतली होती. शिक्षकांना यामध्ये या देखील सूचना देण्यात आल्या आहेत की, ज्या अभ्यासक्रमला यावर्षी कमी केलं आहे, त्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली जावी. जेणेकरून इतर विषयांच्या अभ्यासाला त्याचा फायदा होईल.
ICSE and CBSE Board Result | 15 जुलैपर्यंत दहावी, बारावी बोर्डाचा निकाल लागणार