एक्स्प्लोर
नीट 2018 परीक्षेची तारीख जाहीर
9 मार्चला रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

मुंबई : 'नीट'च्या परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. ही परीक्षा यंदा 6 मे रोजी होणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.
नीटसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया कालपासूनच सुरु झाली आहे. 9 मार्चला रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे. रविवार 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 'नीट' परीक्षा होईल. सीबीएसईतर्फे दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते.
परीक्षार्थींना त्यांचा आधार कार्ड क्रमांक देणं बंधनकारक आहे. जर आधार कार्डमधील माहितीत साधर्म्य आढळलं नाही, तर विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठीचा फॉर्म भरता येणार नाही.
नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.cbseneet.nic.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल.1400 रुपये प्रवेश शुल्क (एससी, एसटी उमेदवारांसाठी 750 रुपये) आकारण्यात येईल. डेबिट/क्रेडीट कार्ड, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे हे पेमेंट करता येईल.
उमेदवार 17 ते 25 वर्ष वयोगटातील असावा. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 30 वर्ष आहे. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही नीटसाठी नोंदणी करु शकतात.
संबंधित बातम्या:
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
Advertisement
Advertisement


















