CBSE Class 12 Exam Cancelled: सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत निर्णय
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
![CBSE Class 12 Exam Cancelled: सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत निर्णय CBSE Board Class XII examinations cancelled CBSE Class 12 Board Exam 2021 details here CBSE Class 12 Exam Cancelled: सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/01/3cc533ec309c782f12f98d8768eafa46_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बेठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
CBSE Board Class XII examinations cancelled pic.twitter.com/8qnwV14JH6
— ANI (@ANI) June 1, 2021
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीपूर्वी पंतप्रधानांना परीक्षा रद्द करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी ट्वीट केले होते की, "बारावी परीक्षेबाबत मुले व पालक खूप चिंतेत आहेत. बारावीची परीक्षा लसीशिवाय घेता कामा नये अशी त्यांची इच्छा आहे. मी केंद्र सरकारला आवाहन करतो की बारावी परीक्षा रद्द करावी. विद्यार्थ्यांच्या मागील कामगिरीच्या आधारावर त्यांचं मूल्यांकन करावं.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक 23 मे बैठक पार पडली होती. या बैठकीत राज्यांचे शिक्षणमंत्री देखील उपस्थित होते. बैठकीत सीबीएसई परीक्षा आयोजित करण्याच्या विविध पर्यायांवर राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या अभिप्रायांवर चर्चा करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)