एक्स्प्लोर

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या विरोधात गुन्हा दाखल

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात बिहारमधील सीतामढी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेशाने वकील असलेले ठाकूर चंदन सिंग यांनी गुरुवारी स्मृती इराणी यांच्यासह महिलांना मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

पाटणा : शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात बिहारमधील सीतामढी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेशाने वकील असलेले ठाकूर चंदन सिंग यांनी गुरुवारी स्मृती इराणी यांच्यासह महिलांना मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. ठाकूर सिंह यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, इराणी यांनी संपूर्ण महिला वर्गाला अपवित्र संबोधने चांगले नाही. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय दिला होता. शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देशात गाजत असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी आल्यानंतर तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल? असा सवाल केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर महिलांना प्रवेशापासून रोखण्यात आलं होतं.
काय म्हणाल्या होत्या स्मृती इराणी? केंद्रीय मंत्री असल्यामुळे मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करु शकत नाही. मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र अपमानित करण्याचा नाही. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का? नाही ना. तसंच, मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या घरात कशा काय जाऊ शकाल? महिलांना मासिक पाळी येणं ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. अशा अवस्थेत तुम्ही मंदिरात जाण्याचा हट्ट आणि प्रार्थना करण्याचा हक्क कसा काय बजावू शकता? असा प्रश्न स्मृती इराणींनी उपस्थित केला होता. 'मी एक हिंदू आहे आणि एका पारशी व्यक्तीशी लग्न केलं आहे. माझ्या मुलांना मी झोराष्ट्रीयन परंपरा शिकवते. जेव्हा मी माझ्या बाळाला घेऊन मुंबईतल्या अंधेरीतील अग्यारीमध्ये गेले होते, तेव्हा मला माझ्या बाळाला नवऱ्याकडे द्यावं लागलं. कारण मला तिथे उभं न राहण्यास सांगितलं होते. माझा नवरा आमच्या बाळाला अग्यारीत घेऊन गेला. कारण पारशी धर्मीयांशिवाय तिथे कोणीही येऊ नये, असा नियमच आहे. तो मी पाळला, आजही तो जेव्हा अग्यारीत जातो तेव्हा मी रस्त्यावर किंवा कारमध्ये त्याची वाट पाहते.' असा किस्सा देखील स्मृती इराणी यांनी सांगितला होता.

महत्त्वाच्या बातम्या

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget