एक्स्प्लोर
माथेफिरु कारचालकाची पोलिसाला धडक, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
बनासकंठा येथील महामार्गावर पोलीस तपासणी सुरु होती. यावेळी एक कारचालक अतिशय वेगानं चेकनाक्याच्या दिशेनं आला. त्याला एका हेडकॉन्स्टेबलनं अडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, या कारचालकानं गाडी थांबवण्याऐवजी थेट पोलिसाला उडवलं.

बनासकंठा (गुजरात) : गुजरातमध्ये एक माथेफिरु कारचालकानं थेट पोलिसालाच धडक दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसाला उडवून माथेफिरु कारचालक फरार झाला आहे. गुजरातमधल्या बनासकांठा जिल्ह्यात घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. बनासकंठा येथील महामार्गावर पोलीस तपासणी सुरु होती. यावेळी एक कारचालक अतिशय वेगानं चेकनाक्याच्या दिशेनं आला. त्याला एका हेडकॉन्स्टेबलनं अडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, या कारचालकानं गाडी थांबवण्याऐवजी थेट पोलिसाला उडवलं आणि तिथून फरार झाला. या घटनेत हेडकॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर या माथेफिरुला शोधण्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. VIDEO :
आणखी वाचा























