एक्स्प्लोर
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बैलगाडी सवारी!

वर्धा : वर्ध्यात स्वप्निल देशमुख या युवक उमेदवाराने चक्क बैलगाडीवरुन जात उमेदवारी अर्ज भरला आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील जिल्हा परिषद सर्कलसाठी त्यांनी अर्ज भरला. या आगळ्यावेगळ्या अर्ज भरण्याच्या पद्धतीमुळे स्वप्निल देशमुखनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राज्यात सध्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं वातावरण आहे. अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. कुणी अर्ज भरण्यासाठी हजारोंची गर्दी घेऊन जात आहे, तर कुणी हटके स्टाईल अवलंबताना दिसतो आहे. वर्ध्यातील उमेदवाराने चक्क बैलगाडी सवारी करत अर्ज भरला आहे.
शेतकरी संघर्ष वाहिनी या संघटनेशी जुळून शेतकऱ्यांसाठी काम करणारा हा युवक आहे. नामांकन अर्ज भारण्यासाठी समुद्रपूर तहसील कार्यालय परिसरात पोहचताच, अनेक पक्षांच्या उमेदवारांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यास भाग पाडलं. स्वप्नील देशमुख अर्ज भरुन परतले, मात्र त्यांच्या अर्ज भरण्याच्या हटके स्टाईलमुळे वर्ध्यात अजूनही चर्चा सुरु आहे.
शेतकरी संघर्ष वाहिनी या संघटनेशी जुळून शेतकऱ्यांसाठी काम करणारा हा युवक आहे. नामांकन अर्ज भारण्यासाठी समुद्रपूर तहसील कार्यालय परिसरात पोहचताच, अनेक पक्षांच्या उमेदवारांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यास भाग पाडलं. स्वप्नील देशमुख अर्ज भरुन परतले, मात्र त्यांच्या अर्ज भरण्याच्या हटके स्टाईलमुळे वर्ध्यात अजूनही चर्चा सुरु आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
धाराशिव
राजकारण























