एक्स्प्लोर
गोव्यात मंत्रिमंडळाची आज पुनर्रचना, मुख्यमंत्र्यांचा चार मंत्र्यांना डच्चू
मुख्यमंत्री आज शनिवारी मंत्रीमंडळातील 4 जुन्या मंत्र्यांना वगळून 4 नव्या मंत्र्यांना स्थान देऊन पुनर्रचना करणार आहेत.
![गोव्यात मंत्रिमंडळाची आज पुनर्रचना, मुख्यमंत्र्यांचा चार मंत्र्यांना डच्चू cabinet reshuffle in goa four ministers will be replaced latest updates गोव्यात मंत्रिमंडळाची आज पुनर्रचना, मुख्यमंत्र्यांचा चार मंत्र्यांना डच्चू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/18103617/Pramod-Sawant.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी गोवा फॉरवर्डच्या उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगावकर आणि अपक्ष महसूलमंत्री रोहन खंवटे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या जागी आज शनिवारी राजभवनवर बाबू कवळेकर, बाबुश मोन्सेरात, मायकल लोबो आणि फिलिप नेरी रॉड्रिग्स यांना शपथ दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री आज शनिवारी मंत्रीमंडळातील 4 जुन्या मंत्र्यांना वगळून 4 नव्या मंत्र्यांना स्थान देऊन पुनर्रचना करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांनी भाजपमध्ये आपला गट विलीन केला. नवी दिल्लीत जाऊन भाजपमध्ये रितसर प्रवेश केला.
गोव्यात आज सायंकाळी 4 वाजता प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची पुनर्रचना होत आहे. पणजीत आज संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या व भाजपमध्ये रुजू झालेल्या 10 पैकी 3 आणि भाजपच्या मायकल लोबो यांना मंत्रिपद दिले जाईल. बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्री असतील. त्यांना नगर नियोजन व कृषी ही विजय सरदेसाई यांच्याकडील खाती दिली जातील. बाबूश मोन्सेरात यांना महसूल व आयटी ही खाती दिली जातील तर फिलीप नेरी यांना जलस्रोत व वनखाते ही दोन खाती दिली जातील. मायकल लोबो यांना बंदर कप्तान, गृहनिर्माण व नव्यानेच स्थापन होणाऱ्या घन कचरा व्यवस्थापन स्वच्छ भारत मिशन हे खाते दिले जाणार आहे.
इजिदोर फर्नांडिस नवे उपसभापती
काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस हे गोवा विधानसभेचे नवे उपसभापती होतील. विद्यमान उपसभापती मायकल लोबो यांना मंत्रीपद मिळणार असल्याने ते आज शनिवारी दुपारी 12 वाजता आपला राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सुपूर्द करतील.
बाबुश मोन्सेरात यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीचा मंत्रिमंडळात समावेश
डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात आज बाबुश मोन्सेरात यांच्या ऐवजी त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात सहभागी होणार आहेत. जेनिफर या ताळगावच्या आमदार आहेत. मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधी असावी यासाठी आपल्याऐवजी जेनिफरला मंत्रिमंडळात घ्या अशी विनंती बाबुश यांनी भाजप नेत्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन हा बदल होणार आहे. बाबुश यांनी काँग्रेस आमदारांचा गट करून भाजपमध्ये विलीन होण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)