एक्स्प्लोर
मोदींचा सूट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने जमा केल्या 6000 कोटींच्या जुन्या नोटा
![मोदींचा सूट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने जमा केल्या 6000 कोटींच्या जुन्या नोटा Businessman Lalajibhai Patel Surrendered Rs 6000 Old Currency Note मोदींचा सूट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने जमा केल्या 6000 कोटींच्या जुन्या नोटा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/15120031/Laljibhai_Patel.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : काळ्या पैशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम आता जाणवू लागला आहे. मोदींचा सूट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सरकारकडे जमा केल्या आहेत.
सूरतमधील हिऱ्यांचे व्यापारी लालजीभाई पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी 4.3 कोटी एवढी मोठी रक्कम मोजून नरेंद्र मोदींचा सूट खरेदी केला होता. गिनीज बुकमध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली होती. या सूटवर लहान अक्षरात नरेंद्र मोदी यांचं नाव लिहिलं होतं.
आता लालजी भाई पटेल यांनी आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. काही वृत्तानुसार, पटेल यांनी सरकारकडे सहा हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. इतकंच नाही लालजीभाई पटेल सरकारला 5 हजार 400 कोटी रुपये कर स्वरुपात देणार आहेत. यात 30 टक्क्यांच्या दराने 1800 कोटी रुपये आयकर आणि 200 टक्के दंड म्हणजेच 3600 कोटी रुपयांचा समावेश आहे.
हिरा व्यापाऱ्याची कोट्यवधीची खरेदी, मोदींचा सूट आणला घरी!
लालजी भाई पटेल कायम चर्चेत लालजीभाई पटेल सामाजिक कार्यांसाठी चर्चेत असतात. ते देशातील सर्वात श्रीमंत दागिन्यांच्या व्यापाऱ्यांपैकी एक आहेत. मागील काही वर्षांपासून ते अनेक सामाजिक कार्यांसाठी देणगी देत आहेत. मोदींचा सूट खरेदी केल्यानंतर ते अधिकच चर्चेत आले. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी 200 कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली होती. दिवाळीसारख्या सणांना ते आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून फ्लॅट आणि कार देणं, यासाठीही ते चर्चेत असतात.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)