एक्स्प्लोर
VIDEO : ब्रेक निकामी झाल्यानं बसखाली चिरडून तिघांचा मृत्यू
अचानक ब्रेक निकामी झालेल्या बसनं रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांसोबतच एका बाईक, एका ऑटोरिक्षाला धडक दिली. ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

हैदराबाद : हैदराबादमध्ये ब्रेक निकामी झालेल्या एका बसनं 3 जणांचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्टची ही बस आहे. अचानक ब्रेक निकामी झालेल्या बसनं रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांसोबतच एका बाईक, एका ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्यानं बस चक्क फ्लायओव्हरवरुन खाली आली. हा सर्व घटनेची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. सध्या या अपघाताबाबत अधिक चौकशी सुरु आहे. VIDEO :
आणखी वाचा























