एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हिडीओ अपलोड करणारा जवान आता 'प्लंबर', BSFकडून तेज बहादूरची बदली
नवी दिल्ली: बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनं अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत फेसबूकवर व्हिडिओ अपलोड करुन खळबळ माजवली होती. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर तेज बहादूर यादवची दुसऱ्या युनिटमध्ये बदली करण्यात आली आहे.
तेज बहादूरला आता प्लंबरचं काम दिलं आहे. त्यामुळे आता असाही प्रश्न विचारण्यात येत आहे की, खरं बोलणाऱ्याला अशी शिक्षा दिली जाणार का?
बीएसएफकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, ड्युटीवर असताना मोबाइल वापरण्यात आल्यानं तेज बहादूर यादववर ही कारवाई करण्यात आली आहे. नियमानुसार, ड्युटीवर असताना कोणत्याही जवानाला फोन वापरता येत नाही. दरम्यान, तेज बहादूर याने आधीही प्लंबरचं काम केलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरणं:
जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत बीएसएफच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. तेज बाहदूर यादव असं या जवानाचं नाव आहे.
“आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभं राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.”, असे सांगतना तेज बहादूर यादव यांनी शूट केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहनही देशवासियांना केलं आहे.
तेज बहादूरला मद्यप्राशन करण्याची वाईट सवय जडली होती: बीएसएफ
दरम्यान, या प्रकरणी बीसएफकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, ‘सुरुवातीच्या दिवसात तेज बहादूर यादवला नियमित काउंसलिंगची गरज होती. तो न सांगता बऱ्याचदा ड्युटीवर गैरहजर असायचा. त्याला दारु पिण्याचीही वाईट सवय जडली होती. त्याला जास्तीत जास्त वेळ मुख्यालयाजवळ ड्युटी दिली जात होती. पण, मागील 10 दिवसापूर्वी त्याला बॉर्डरवर पाठविण्यात आलं. कारण की, त्याचं काउंसलिंग नीट झालेलं आहे की, याची चाचपणी केली जावी यासाठी त्याला तिथे पाठविण्यात आलं होतं.’ असं या पत्रकात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
जवान तेज बहादूरचा बीएसएफवर आणखी एक आरोप
‘मी बेशिस्त होतो तर मला पुरस्कार का दिले’, जवानाचा बीएसएफला सवाल
जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप
VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement