(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Bangladesh Border : त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर चकमक, बीएसएफचा एक जवान शहीद
India Bangladesh Border : भारत-बांग्लादेश सीमेवर चकमकीत बीएसएफ जवान गिर्जेश कुमार शहीद झाले. त्रिपुरा येथे ही घटना घडली आहे.
India Bangladesh Border : उत्तर त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवादी आणि सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. गिर्जेश कुमार असे शहीद जवानाचे नाव असून, चकमकीत जखमी झाल्यानंतर त्यांना आगरतळा येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपाचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. गिर्जेश कुमार हे बीएसएफच्या 145 व्या बटालियनमध्ये कार्यरत होते.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार, 145 बीएन बीएसएफ, सेक्टर पानीसागर आणि त्रिपुराच्या बीएसएफ गस्ती दलावर संशयित अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. बीएसएफच्या जवानांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. बीएसएफच्या प्रत्युत्तरानंतर अतिरेकी घनदाट जंगलात पळून गेले. परंतु, या चकमकीत गिरजेश कुमार यांना गोळी लागली. त्यामुळे त्यांना तत्काळ हेलिकॉप्टरने आगरतळा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार सुरू असताना कुमार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
HC Girjesh Kr Uddey succumbed during treatment of the bullet injuries he suffered. He was part of a BSF patrol team that came under firing in Sector Panisagar, Tripura by suspected NLFT(BM) insurgents. https://t.co/a04De4uGXN pic.twitter.com/TutmyP1o7j
— ANI (@ANI) August 19, 2022
चकमकीनंतर त्रिपुरा बीएसएफचे आयजी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी बंडखोरांना पडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेची माहिती घेतली. दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचनपूर उपविभागातील सीमा-2 चौकी परिसरात बीएसएफचे एका पथकाची शोध मोहीम सुरू असताना बांगलादेशकडून गोळीबार सुरू झाला. पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी सांगितले, ''बांगलादेशातील रंगमती हिल्स जिल्ह्यातील जुपुई भागातून जोरदार सशस्त्र अतिरेक्यांच्या एका गटाने बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली.
किरण कुमार यांनी सांगितले की, या चकमकीत एका बीएसएफ जवान गिर्जेश कुमार यांना चार गोळ्या लागल्या. त्यांमुळे ते शहीद झाले. परंतु, बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमुळे अतिरेकी फारसे नुकसान करू शकले नाहीत. या घटनेनंतर भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसरात शोधमोहीमही तीव्र करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
Fisheries News : देशात 'नील क्रांती' आणण्याच्या अभियानाला मंजूरी, इस्रायलच्या मदतीनं चिलापी माशांच्या उत्पादनासाठी प्रकल्प उभारणार
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आजही दिलासा; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात विकलं जातंय सर्वात महाग पेट्रोल?