एक्स्प्लोर
ब्रिक्स संमेलनात पाचही राष्ट्रांचे प्रमुख मोदी जॅकेटमध्ये
![ब्रिक्स संमेलनात पाचही राष्ट्रांचे प्रमुख मोदी जॅकेटमध्ये Brics All Five Leaders In Modi Jacket ब्रिक्स संमेलनात पाचही राष्ट्रांचे प्रमुख मोदी जॅकेटमध्ये](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16082547/Modi-Jacket-BRICKS.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पणजी : गोव्यात सुरु असलेल्या 'ब्रिक्स' संमेलनात पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळाली. संमेलनासाठी आलेल्या चार देशांच्या प्रमुखांनी मोदी जॅकेट परिधान केलं होतं.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, ब्राझिलचे राष्ट्रपती मिचेल टेम आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जाकोब झुमा यांनी मोदी जॅकेट परिधान केलं होतं. हीच जॅकेट्स घालून सर्व राष्ट्रप्रमुखांनी डिनरला हजेरी लावली आणि फोटोसेशन केलं.
पुतिन यांनी निळ्या रंगाचं, जिनपिंग आणि टेम यांनी लाल रंगाचं तर झुमा यांनी हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीम रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं.
ब्रिक्स परिषदेच्या पहिल्याच दिवशी भारत आणि रशियामध्ये 16 महत्वपूर्ण करार झाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिषदेदरम्यान भेट झाली.
भारत आणि रशिया यांच्यात एस 400 मिसाईल सिस्टीमबाबतचा करार झाला. यासोबतच कामोव्ह हेलिकॉप्टर खरेदीचाही करार झाला. अणुऊर्जा, गॅस पाईप लाईन, स्मार्ट सिटी, जहाज बांधणी यांसह 16 महत्वपूर्ण करारांवर दोन्ही देशांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.
राष्ट्रपती पुतिन आणि आपल्याकडून दहशतवाद आणि त्याला समर्थन देणाऱ्यांना बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे ठणकावलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)