Corona Vaccine : देशातील 18 वर्षांवरील सर्वांना आता बूस्टर डोस घेता येणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा
Ministry of Health : ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना आता बूस्टर डोस घेता येणार आहे.
![Corona Vaccine : देशातील 18 वर्षांवरील सर्वांना आता बूस्टर डोस घेता येणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा Corona Vaccine Ministry of Health announces who are 18 years of age would be eligible for precaution dose at private vaccination centres Corona Vaccine : देशातील 18 वर्षांवरील सर्वांना आता बूस्टर डोस घेता येणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/fc2b2d5e36b201c7a8cc5ff2706e6315_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहित काही राज्यांतील कोरोना संदर्भातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानंतर आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.
Precaution doses to be now available to 18+ population group from 10th April at private vaccination centres: Ministry of Health
— ANI (@ANI) April 8, 2022
गेल्या वर्षी 16 जानेवारीला देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील सर्व प्रौढांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 185.38 कोटी डोस दे्यात आले आहेत. 15 वर्षांवरील जवळपास 96 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 83 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai Vaccination : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आठवडाभरात महानगरी 100 टक्के लसवंत...
- कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर आता पुन्हा पंतप्रधान मोदींचा फोटो येणार, सूत्रांची माहिती
- Corona Vaccine : नोव्हॅक्सच्या कोरोना लसीला आपातकालीन वापरासाठी DCGI ची मंजुरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)