एक्स्प्लोर
केरळमध्ये संघ कार्यालयाबाहेर स्फोट, 4 स्वयंसेवक जखमी
कोझिकोड : केरळमधील कोझिकोड जिल्हातील नदापुरम येथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळ स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 4 स्वयंसेवक जखमी असून, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप या स्फोटांच्या मागे नेमका कुणाचा हात आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हा स्फोट रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास झाला. यात बाबू आणि विनेश हे स्वयंसेवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोझिकोडच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतर दोन स्वयंसेवकांवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मागील काही दिवसांपासून केरळमध्ये संघ स्वयंसेवकांच्या हत्येचं सत्र सुरू आहे, या हत्येच्या मागे केरळमधील डाव्यांचा हात असल्याचा आरोप संघाच्या कार्यकर्त्यांकडून होतो. या घटनांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रा.स्व. संघाच्या वतीने संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये निषेध रॅली काढण्यात आली होती. याशिवाय बंगळुरु, वडोदरा, उज्जैन, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी संघ स्वयंसेवकांनी रस्त्यावर उतरुन आपला निषेध व्यक्त केला.
केरळमध्ये सीपीएमचे सरकार सत्तारुढ झाल्यापासून 8 महिन्यात संघाच्या 12 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. तसेच गेल्या 20 वर्षात 250 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा संघाने आरोप केला आहे.
दरम्यान, केरळमध्ये या पूर्वीही डावे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन हिंसाचारात झालं होतं. पण गेल्या दशकभरात संघाच्या कार्यकर्ते आणि डावे यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद होत असून, यातूनच हे हत्यासत्र सुरु असल्याचं बोललं जातंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement