एक्स्प्लोर
'त्या' विधानावर ओम पुरींना पश्चाताप
नवी दिल्ली: जम्मू- काश्मिरच्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले जवान नितीन यादव यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेते ओम पुरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल पश्चाताप व्यक्त करत यादव कुटुंबियांची माफी मागितली आहे.
ओम पुरी यांनी शहीद यादव यांच्या घरी इटावाला जाऊन होमहवन करुन प्रायश्चित केलं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात चर्चा करताना जवानांना सीमेवर जायला कोणी सांगितलं होतं? असा प्रश्न ओम पुरी यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर ओम पुरी यांनी माफीही मागितली होती.
पण आज ओम पुरींनी उत्तरप्रदेशमधील इटावाच्या शहीद जवान नितीन यादव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement