(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RSS ची तालिबानशी तुलना केल्याने गीतकार जावेद अख्तर अडचणीत, राम कदम म्हणाले, 'माफी मागा, अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही'
भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले आहे की, जावेद अख्तर यांचे विधान केवळ लज्जास्पदच नाही तर कोट्यवधी आरएसएस (RSS) कार्यकर्त्यांना वेदनादायक आणि अपमानास्पद आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार, कवी, पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करण्याच्या त्यांच्या वक्तव्याचा जोरदार विरोध होत आहे. आता महाराष्ट्रातील भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे की ते जावेद अख्तर यांच्या तालिबान आणि आरएसएसची तुलना करण्याच्या वक्तव्याला विरोध करणार असून त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.
भाजपचे प्रवक्ते राम कदम म्हणाले, की जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तालिबान संघटनेशी तुलना केल्याच्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे. राम कदम यांनी इशारा दिला की जोपर्यंत त्यांनी राष्ट्रासाठी आपले जीवन समर्पित केलेल्या संघाच्या पदाधिकाऱ्यांना हात जोडून माफी मागितल्याशिवाय ते किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.
जावेद अख्तर यांचे दुर्दैवी व्यक्तव्य न केवळ संघ, विश्वहिंदूपरिषद च्या कोट्यावदी कार्यकर्ते आणि जगभरातील या विचारधारेला मानणारे कोट्यावदी लोकांचा अपमान आहे! जोपर्यंत जावेदअख्तर हाथ जोडून माफी माँगत नाही तोपर्यंत त्याची, त्यांच्या परिवाराची कोणतीही फ़िल्म ह्या भूमित चालू देणार नाही pic.twitter.com/XZ0HrmNLMH
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) September 4, 2021
राम कदम यांनी म्हटले आहे की, जावेद अख्तर यांचे वक्तव्य केवळ लज्जास्पदच नाही तर कोट्यवधी आरएसएस कार्यकर्त्यांसाठी वेदनादायक आणि मानहानीकारक आहे. आरएसएसच्या विचारधारेचे पालन करणाऱ्या जगभरातील कोट्यवधी लोकांना या लेखकाने अपमानित केले आहे. टिप्पणी करण्यापूर्वी त्यांनी विचार केला पाहिजे होते की समान विचारसरणीचे लोक आता सरकार चालवत आहेत आणि राज धर्माचे अनुसरण करीत आहेत.
जावेद अख्तर यांचे मुलाखतीदरम्यान वक्तव्य
एका मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, की "जे संघाचे समर्थन करतात त्यांची मानसिकताही तालिबानसारखीच आहे. जे संघाचे समर्थन करतात त्यांनी आत्मपरीक्षण करावे." ते पुढे म्हणाले, "तालिबान आणि तुम्ही ज्यांना पाठिंबा देत आहात त्यांच्यात काय फरक आहे? त्यांची जमीन मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहेत. दोघांची मानसिकता समान आहे." त्यांच्या वक्तव्याला जोरदार विरोध होत आहे.