एक्स्प्लोर

Pallavi Dempo : आलीशान गाड्या ते थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यातील सर्वात गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?

पल्लवी यांच्याकडे प्रतिज्ञापत्रानुसार वेगवेगळ्या सीरिजच्या तीन मर्सिडीज बेंझ कार आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 1.69 कोटी, 16.42 लाख, 21.73 लाख रुपये आहे. कॅडिलॅक कार आहे, ज्याची किंमत 30 लाख आहे.

Pallavi Dempo : दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपने व्यापारी श्रीनिवास धेंपो यांच्या पत्नी पल्लवी धेम्पो (Pallavi Dempo Goa Net Worth) यांना उमेदवारी दिली आहे. पल्लवी यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. रिटर्निंग ऑफिसरसमोर दाखल केलेल्या 119 पानांच्या प्रतिज्ञापत्रात पती श्रीनिवास धेम्पो यांच्यासह एकूण संपत्ती सुमारे 1,400 कोटी रुपये आहे. धेम्पो ग्रुपचा व्यवसाय फ्रँचायझी फुटबॉल लीगपासून रिअल इस्टेट, जहाजबांधणी, शिक्षण आणि खाण व्यवसायापर्यंत विस्तारला आहे. 

दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट

पल्लवी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे दिसून येते, तर श्रीनिवास यांच्या मालकीच्या मालमत्तेचे मूल्य 994.8 कोटी रुपये आहे. पल्लवी यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 28.2 कोटी रुपये आहे, तर श्रीनिवास यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 83.2 कोटी रुपये आहे. श्रीनिवास धेम्पोंच्या गोवा आणि देशाच्या इतर भागांमध्ये असलेल्या मालमत्तांव्यतिरिक्त, या जोडप्याकडे दुबईमध्ये एक अपार्टमेंट देखील आहे, ज्याचे सध्याचे बाजार मूल्य 2.5 कोटी रुपये आहे. याशिवाय लंडनमध्येही 10 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे.

पल्लवी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे वेगवेगळ्या सीरिजच्या तीन मर्सिडीज बेंझ कार आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 1.69 कोटी, 16.42 लाख, 21.73 लाख रुपये आहे. कॅडिलॅक कार आहे, ज्याची किंमत 30 लाख आहे. महिंद्रा थार एसयूव्ही आहे ज्याची किंमत 16.26 लाख रुपये आहे. पल्लवी यांनी प्रतिज्ञापत्रात 5.7 कोटी रुपयांचे सोने असल्याची माहिती दिली आहे. पल्लवी यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 10 कोटी रुपयांचे आयकर रिटर्न भरले, तर श्रीनिवास यांनी त्याच वर्षासाठी 11 कोटी रुपयांचे रिटर्न भरले.

पल्लवीकडे 217.11 कोटी रुपयांचे रोखे 

पल्लवीकडे 217.11 कोटी रुपयांचे रोखे, 12.92 कोटी रुपयांची बचत आणि सुमारे 9.75 कोटी रुपयांच्या इतर गोष्टी आहेत. 49 वर्षीय भाजप उमेदवाराने एमआयटी, पुणे विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा लोकसभा जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. पल्लवी यांच्यासोबत भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उत्तर गोव्यातील भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक हे पाचवेळा खासदार राहिले आहेत आणि सातवी निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले, 'भाजप सरकारने गोव्यातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 1999 आणि 2014 प्रमाणे भाजप गोव्याच्या दोन्ही लोकसभा जागा जिंकेल. श्रीपाद नाईक यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2.05 कोटी रुपये किंमतीची जंगम मालमत्ता, 8.81 कोटी किंमतीची स्थावर मालमत्ता आणि 17 लाख वार्षिक उत्पन्न जाहीर केले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget