Abhijit Bichukale on Udayanraje Bhosale : अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
Abhijit Bichukale on Udayanraje Bhosale : सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं असून यावेळी दिल्लीत काम करणे संधी द्या. 19 एप्रिलला अर्ज भरणारच असे अभिजित बिचकुले यांनी सांगितले.
सातारा : आपल्या बेधडक वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असणाऱ्या बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. अभिजीत बिचकुले सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकरून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अभिजीत बिचकुले यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर करताना उदयनराजे भोसले यांना थेट सल्लाही दिला आहे.
उदयनराजेंनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे
ते पुढे म्हणाले की शरद पवार आणि उदयनराजेंमध्ये हाडवैर आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना तिकीट मिळावे, अशी उदयनराजे यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. मात्र, भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला? याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे. लोकांनी सुद्धा आत्मपरीक्षण केले पाहिजे. या सगळ्यांमध्ये एकटा लढत आहे यावेळी मला संधी द्या असे आवाहन बिलकुले यांनी केले.
कोण कोणाचे कार्यकर्ते सतरंज्या उचलणारे याच्याशी माझं काही देणं-घेणं नाही
आपली उमेदवारी जाहीर करताना अभिजीत बिचकुले म्हणाले की, कोणता पक्ष, कोणते नेते, कोण कोणाचे कार्यकर्ते सतरंज्या उचलणारे आहेत याच्याशी माझं काही देणं-घेणं नाही. 2004 ते 2019 पर्यंत मी चार निवडणुका लढवल्या आहेत. माझ्या अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला असून सातारच्या जनतेने 2009 मध्ये मला बारा हजारहून जास्त मतदान केले होते. छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आंबेडकरांचे संविधान टिकवायचं आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्मांना एकत्र घेऊन नवी दिशा द्यायची असल्याचे अभिजीत बिचकुले म्हणाले.
त्यांनी सांगितले की लोकसभेसाठी मी माझी उमेदवारी जाहीर करत आहे. माझ्या संपूर्ण चाहत्यांनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा, असे आवाहन अभिजीत बिचकुले यांनी केले. ते म्हणाले की सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं असून यावेळी दिल्लीत काम करणे संधी द्या. 19 एप्रिलला अर्ज भरणारच असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या