एक्स्प्लोर
संघाच्या शाखेतल्या महिलांना कधी शॉर्ट्समध्ये पाहिलंय? : राहुल गांधी
बडोद्यात आज विद्यार्थी संवाद मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप महिलाविरोधी असल्याची टीका केली.
बडोदा : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांसोबत भेदभाव केला जातो, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी संघाच्या गणवेषाचा आधार घेतला. खाकी हाफ पँट हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेष आहे. पण, आरएसएसच्या शाखेत महिलांना कधी हाफ पँटमध्ये पाहिलंय का? असा सवाल त्यांनी केला. गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत. बडोद्यात आज विद्यार्थी संवाद मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप महिलाविरोधी असल्याची टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, "जोपर्यंत महिला शांत आहे, काही बोलत नाही, तोपर्यंत ठीक आहे, पण महिलेने तोंड उघडलं तर तिला गप्प बसवा, असे ह्यांचे (भाजप) विचार आहेत. ह्यांची मुख्य संघटना आरएसएस आहे. किती महिला त्यात आहेत? शाखेतल्या महिलांना कधी शॉर्ट्समध्ये पाहिलंय? मी तरी पाहिलं नाही!" याशिवाय भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या निमित्ताने सरकारलाही टीकेचं लक्ष्य केलं. त्याआधी 2014 लोकसभा निवडणुकीतील पराभव स्वीकारत, भाजपकडून झालेल्या सडकून पराभवाने माझे डोळे उघडल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. काँग्रेस उपाध्यक्षांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशणा साधला. "तुम्ही सेल्फीची मजा घेत आहात, पण या फोनने चीनी तरुणांना रोजगार दिला आहे." पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण























