(Source: ECI | ABP NEWS)
तेजस्वी यादव -राहुल गांधींची जोडी नितीश कुमार-नरेंद्र मोदींवर भारी? पहिला सर्व्हे समोर, जनतेचा कौल कुणाला?
Bihar Assembly Elections Survey: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं वोट वाइब संस्थेचा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार बिहारमध्ये कांटे की टक्कर असेल.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एक आश्चर्यकारक सर्व्हे समोर आला आहे. वोट वाइबचे सह संस्थापक अमिताभ तिवारी यांच्या सर्व्हे नुसार बिहारमध्ये महागठबंधन एनडीएच्या थोडंस पुढं दिसत आहे. 36 टक्के लोकांचा विश्वास इंडिया आघाडीवर आहे. तर, 35 टक्के लोकांचा विश्वास एनडीएवर आहे. म्हणजेच बिहारमध्ये विजय मिळवणं कोणत्याही आघाडीसाठी सोपं दिसून येत नाही. प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला 10 टक्के लोक पर्याय मानत आहेत. नोकरीच्या मुद्यावर 40 टक्के लोकांचा विश्वास महागठबंधनवर दिसून येतो. एनडीएच्या बाबत विचार केल्यास हा आकडा 30 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
अमिताभ तिवारी काय म्हणाले?
अमिताभ तिवारी यांनी दोन्ही आघाड्यांचे मतदार निश्चित असल्याचं म्हटलं. महागठबंधनकडे मुस्लिम यादव मतदार आहे. तर एनडीएकडे EBC, महादलित, उच्च जात समुहातील मतदार आहेत. सरकर विरोधात 48 टक्के लोकांमध्ये नाराजी आहे. तर, 54 टक्के लोकांना त्यांचा आमदार बदलायचा आहे. नाराजीचा फायदा महागठबंधन आणि जन सुराज यांच्यात विभागला जाण्याची शक्यता आहे.
प्रशांत किशोर यांचा प्रभाव कसा राहणार? यशवंत देशमुख काय म्हणाले?
सी वोटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी मतदार यादी पडताळणीमुळं मतदारांमध्ये अस्वस्थता आहे. यामुळं विरोधी पक्षांना नुकसान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं. मात्र, उच्च जातीमधील लोक देखील त्रस्त आहेत. प्रसांत किशोर याबाबत बोलताना यशवंत देशमुख एनडीए आणि महागठबंधनला नुकसान पोहोचवू शकतात असं म्हटलं. जनतेतील मोठ्या समुहाला वाटतं प्रशांत किशोर दोन्ही आघाडींची मत कमी करु शकतात.
यशवंत देशमुख पुढं म्हणाले, की मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कमी सक्रीय असणं एनडीएचं नुकसान करु शकतं. त्याचवेळी तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाची पहिली पसंत आहेत. मात्र, त्यांचं निवडणूक अभियान अजूनही आक्रमक दिसून येत नाही.
जंगलराज नरेटिव्ह कमजोर!
वरिष्ठ पत्रकार सतीश के सिंह यांच्या मते अलीकडच्या काळात झालेल्या हत्यांच्या घटनांमुळं कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यामुळं एनडीएचा जंगलराजचा मुद्दा कमजोर झाला आहे. सतीश के सिंह यांच्या मते बेरोजगारीच्या मुद्यावर बिहारमध्ये आणीबाणी सारखी स्थिती आहे. या मुद्यावर तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला फायदा मिळू शकतो. नितीश कुमार यांची गैरहजेरी आणि बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यामुळं एनडीएला धक्का बसत आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आलेल्या मतदार यादीच्या स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजनमुळं विरोधी पक्ष आक्रमक झालेत.
























