एक्स्प्लोर

निवडणूक आयोग म्हणजे मोदी-शाहांची विंचवांची शेती; सामनातून निवडणूक आयोगावर हल्लाबोल

निवडणूक यंत्रणा घोटाळेबाजीचा अड्डा बनलाय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लुटली,आता बिहारवर दरोडा, अशी टीकाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

निवडणूक आयोग म्हणजे मोदी-शाहांची विंचवांची शेती असून लोकशाही,निवडणूक प्रक्रिया विषारी केली जातेय, असा हल्लाबोल शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या आजच्या दैनिक सामनातून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगामुळेच लोकशाहीची केविलवाणी अवस्था झाली आहे. निवडणूक यंत्रणा घोटाळेबाजीचा अड्डा बनलाय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लुटली,आता बिहारवर दरोडा, अशी टीकाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे मोदी-शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती आहे. भारतीय लोकशाही, निवडणूक प्रक्रिया विषारी करण्याचे काम या लोकांनी केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर भारतीय नागरिकांचे लक्ष आहे. ईडी, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्थेवर ईस्ट इंडियाच्या व्यापार मंडळाने ताबा मिळवला आहे व या 'चाच्यां'नी लोकशाही मूल्यांचे अपहरण करून लोकांचे स्वातंत्र्य ओलीस ठेवले आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला कठोर दंडित करणे गरजेचे आहे. भारतीय लोकशाहीची सध्या जी केविलवाणी अवस्था झाली आहे ती आपल्या निवडणूक आयोगामुळेच, असं सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

बिहारमध्ये 'व्होट बंदी'चा जुलूम सुरू झाला-

भारताची निवडणूक यंत्रणा म्हणजे घोटाळेबाजीचा अड्डा बनला आहे. विशेषतः देशात ईस्ट इंडिया कंपनी प्रा.लि. (सुरत) चे राज्य आल्यापासून भारताचा निवडणूक आयोग या ईस्ट इंडियाच्या घरचा चाकर म्हणून काम करीत आहे. लोकशाहीच्या मृत्यूची घंटा वाजवणारा हा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लुटल्यावर भाजप व निवडणूक आयोग युतीने बिहारच्या निवडणुकीवर दरोडा घालण्याचे कार्य हाती घेतले आहे. Special Intensive Revision (SIR) म्हणजे विशेष गहन पुनरीक्षणाच्या नावाखाली बिहारात 'व्होट बंदी'चा जुलूम सुरू झाला आहे. संविधानाने प्रत्येक अधिकृत भारतीय नागरिकास दिलेला मताचा अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. अपात्र व्यक्तींना मतदार यादीतून दूर करून निवडणूक प्रक्रिया शुद्ध करण्याचा आमचा आटापिटा आहे असे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सांगितले हे सपशेल झूठ आहे. या पवित्र कार्यात आतापर्यंत 55 लाख मतदारांची नावे आयोगाने काढली आहेत. या सर्व मतदारांकडे आधार, रेशन व निवडणूक ओळखपत्र होते, पण हे सर्व मतदार यादीसाठी वैध ठरले नाहीत. निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नोंदणीसाठी जाचक कागदपत्रे, पुराव्याच्या अटी टाकल्या. (आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे जन्माचे दाखले हवेत) ग्रामीण भागातील गरीब जनता यापैकी एकही अट पूर्ण करू शकत नाही.

सत्तेचा प्रचंड रेटा लावून भाजप मतांवर दरोडे टाकत आहेत-

निवडणूक आयोगाचे दोन लाख 'बीएलओ' बिहारात मतदार नोंदणीचे काम चोखपणे बजावत असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला. हे दोन लाख 'बीएलओ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छुप्या स्लिपर्स सेलचे लोक असून मतदार यादीत कोणाला ठेवायचे व कोणाला वगळायचे याचा निर्णय ते घेतात. कोण, याचा अंदाज घेत त्यांची नावे समाविष्ट करणे आणि वगळणे हे कार्य सुरू आहे. अशाने निवडणूक निष्पक्ष पद्धतीने कशी होणार? मुसलमान, ख्रिश्चन या भाजपविरोधी मतदारांची नावे मतदार यादीत येऊच नयेत. शिवाय लालू यादव वगैरेंना समर्थन देणारा वर्ग, गावे, तालुक्यातील मतदार याद्या पुनरीक्षणाच्या नावाखाली साफ केल्या जात आहेत. हे चित्र भयंकर आहे. निवडणूक आयोगाने एक हास्यास्पद दावा केला आहे, तो म्हणजे मतदार यादीत नाव येण्यासाठी आधारकार्ड हा पुरावा वैध नाही. आपण नागरिक असल्याचा हा पुरावा नाही. ते केवळ एक ओळखपत्र आहे. निवडणूक आयोगाचा हा दावा म्हणजे अकलेची दिवाळखोरी आहे. आधारकार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे. त्यावर 12 अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे. जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केलेला आहे. हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा असतो. आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक 'आयडी' प्रणाली आहे. जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर यांनीदेखील आधारचे वर्णन 'जगातील सर्वात अत्याधुनिक आयडी प्रोग्राम' असे केले आहे. मात्र निवडणूक आयोग आता म्हणतो की, आधारकार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. राहुल गांधी यांनी 'एसआयआर'चा विषय लावून धरला आहे. गांधी त्यावर बोलत आहेत, पण उपयोग काय? हा प्रश्न आहेच. सत्तेचा प्रचंड रेटा लावून भाजप व त्याचे लोक मनमानी पद्धतीने निवडणुका लढत आहेत आणि मतांवर दरोडे टाकत आहेत.

अचानक साठ लाख मतदार वाढले-

बिहारात आतापर्यंत साधारण 55-60 लाख मतदार वगळले गेले आहेत, तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाचनंतर अचानक साठ लाख मतदार वाढले. हे मतदार आले कोठून? मतदार यादीत घुसवले कोणी? या सगळयांनी 'आधारकार्ड' व निवडणूक ओळखपत्रावरच मतदान केले. मग बिहारात 'एसआयआर'च्या नावाखाली घोळ घालून जो गोंधळ उडवला जातोय तो कशासाठी? सर्वोच्च न्यायालयाने एकदा निवडणूक आयोगाला या प्रश्नी फटकारले. 'आधारकार्ड हा मतदार नोंदणीचा पुरावा का नाही?' या न्यायालयाच्या प्रश्नावर 'आम्हाला मतदार यादी व निवडणूक प्रक्रिया शुद्ध आणि पवित्र करायची आहे', हे आयोगाचे उत्तर धक्कादायक आहे. भारतीय लोकशाहीची ज्यांनी गटारगंगा केली आहे ते निवडणूक प्रक्रिया पवित्र करायला निघाले आहेत. लोकशाहीचा छळ चालला आहे व भारतीय मतदारांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह गाडले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने 'ईडी'सारख्या तपास यंत्रणांना त्यांची जागा दाखवली तशी निवडणूक आयोगाच्या मनमानीची नांगी ठेचायला हवी. सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे मोदी-शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती आहे. भारतीय लोकशाही, निवडणूक प्रक्रिया विषारी करण्याचे काम या लोकांनी केले. बहुमताचा व लोकभावनेचा आदर न करता निवडणूक आयोगाने दिलेले निकाल लोकशाहीचा गळा घोटणारे आहेत. हे अधिक काळ चालत राहिले तर 'भारतात कधीकाळी लोकशाही होती' असे पुढे केव्हा तरी एखाद्या शिलालेखावर नमूद करावे लागेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर भारतीय नागरिकांचे लक्ष आहे. ईडी, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्थेवर ईस्ट इंडियाच्या व्यापार मंडळाने ताबा मिळवला आहे व या 'चाच्यां'नी लोकशाही मूल्यांचे अपहरण करून लोकांचे स्वातंत्र्य ओलीस ठेवले आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला कठोर दंडित करणे गरजेचे आहे. भारतीय लोकशाहीची सध्या जी केविलवाणी अवस्था झाली आहे ती आपल्या निवडणूक आयोगामुळेच, अशी टीका दैनिक सामनातून करण्यात आली आहे. 

संबंधित बातमी:

Nishikant Dubey: तुम्ही आपटून आपटून कसे मारणार?; लोकसभेचं कामकाज थांबताच मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना घेरलं, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Embed widget