एक्स्प्लोर

Bihar Caste Census : नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक, बिहारमध्ये जातीनिहाय गणना सर्व्हेचे आकडे जाहीर, कुठल्या जातीचे किती?

Bihar Caste Census Survey Data : बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 63 टक्के आहे. 27 टक्के लोकसंख्या मागास, तर 36 टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ 2 टक्के एवढी आहे.

Bihar Caste Survey Result : बिहार सरकारने जातीनिहाय गणनेची (Bihar Caste Census Result) आकडेवारी जाहीर केली आहे. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर केली आहे. बिहार सरकारनं जातीय जनगणनेचे आकडे जाहीर केले आहेत. बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 63 टक्के आहे. 27 टक्के लोकसंख्या मागास, तर 36 टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ 2 टक्के एवढी आहे. सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानं बिहारमध्ये पुन्हा एकदा मंडल राजकारणाची एन्ट्री झाल्याचं बोललं जातं आहे. महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातीय जनगणनेची मागणी होत आहे.

बिहार सरकारकडून जातीनिहाय गणनेचे आकडे जारी

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. बिहार सरकारकडून जातीय जनगणनेची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. बिहार सरकारने सोमवारी पत्रकार परिषदेत जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. बिहारचे मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जातीय जनगणनेचं काम पूर्ण झालं आहे. 

नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक

सरकारने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये 13 कोटी लोकसंख्या आहे. यामध्ये सर्वाधिक हिंदू 81.9 टक्के आहेत. तर मुस्लिम 17.7 टक्के, ख्रिश्चन 0.05 टक्के, शिख 0.01 टक्के, बौद्ध 0.08 टक्के, जैन 0.0096 टक्के आणि अन्य धर्मीय 0.12 टक्के आहेत. 

अनुसूचित जमातीची म्हणजे एसटी प्रवर्गाची लोकसंख्या 1.68 टक्के आहे. बिहारमध्ये अनारक्षित सर्वसाधारण लोकसंख्या 15.52 टक्के आहे. ब्राह्मणांची लोकसंख्या 3.66 टक्के आहे. बिहारमधील भूमिहीन लोकसंख्या 2.86 टक्के आहे. बिहारमध्ये यादवांची लोकसंख्या 14 टक्के तर, कुर्मी समाजाची लोकसंख्या 2.87 टक्के आहे. मुसहरची लोकसंख्या 40 टक्के आहे.

जातनिहाय गणनेची आकडेवारी

  • मागास वर्ग - 27.1286 टक्के (लोकसंख्या - 35463936)
  • अति मागास वर्ग - 36.0148 टक्के (लोकसंख्या - 47080514)
  • अनुसूचित जाती - 16.6518 टक्के (लोकसंख्या - 25689820)
  • अनुसूचित जमाती - 1.6824 टक्के (लोकसंख्या - 2199361)
  • अनारक्षित - 15.5224 टक्के (लोकसंख्या - 20291679)
  • एकूण लोकसंख्या -130725310

मुख्यमंत्री नितीश यांच्याकडून अभिनंदन

आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करून गणना करणाऱ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केलं आहे. जातनिहाय गणनेचा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्य सरकार जात आधारित जनगणना करेल, हा निर्णय बिहार विधानसभेच्या सर्व 9 पक्षांच्या संमतीने घेण्यात आला. 2 जून 2022 रोजी याला मान्यता मिळाली. या आधारे राज्य सरकारने स्वत:च्या संसाधनातून जातनिहाय गणना केली आहे. जातीवर आधारित जनगणनेने केवळ जातीच उघड केल्या नाहीत तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीचीही माहिती दिली आहे. त्या आधारे सर्व घटकांच्या विकास आणि उन्नतीसाठी पुढील कार्य केलं जाईल.

धर्मावर आधारित लोकसंख्या

  • हिंदू - 81.99 टक्के  (लोकसंख्या - 107192958)
  • इस्लाम - 17.70 टक्के (लोकसंख्या - 23149925)
  • ईसाई - 0.05 टक्के (लोकसंख्या - 75238)
  • सिख - 0.011 टक्के (लोकसंख्या - 14753)
  • बौद्ध - 0.0851 टक्के (लोकसंख्या - 111201)
  • जैन - 0.0096 टक्के (लोकसंख्या - 12523)
  • इतर धर्म - 0.1274 टक्के (लोकसंख्या - 166566)
  • कोणताही धर्म नाही - 0.0016 टक्के (लोकसंख्या - 2146)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget