एक्स्प्लोर
बनारस हिंदू विद्यापीठात गोळीबार, हॉस्टेलबाहेर विद्यार्थ्याची हत्या
अंतर्गत वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, मृत विद्यार्थी गौरव सिंहचे वडील राकेश सिंह हे बीएचयूमध्येच मोठ्या पदावर कार्यरत होते.
वाराणसी : वाराणसी हिंदू विद्यापीठ म्हणजेच बीएचूयमधील एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण आहे. मृत विद्यार्थी गौरव सिंह एमसीएचं शिक्षण घेत होता. विद्यापीठाच्या लाल बहादूर शास्त्री हॉस्टेलमध्ये तो राहत होता. घटनेनंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघातील बीएचयू परिसरात भररस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली. गौरव सिंह हॉस्टेलसमोर मित्रांसोबत उभा राहून गप्पा मारत होता. मात्र त्याचवेळी काही लोक तिथे आले आणि त्यांनी गौरववर अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्या झाडून हल्लेखोर घटनास्थळावरुन तातडीने पसार झाले. तर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरवला बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं.
ट्रॉमा सेंटरमध्ये गौरव सिंहवर उपचार करण्यात आले, परंतु अतिशय रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांना गौरवचे प्राण वाचवता आले नाहीत. गौरव सिंहच्या हत्येने संपूर्ण कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ट्रॉमा सेंटरच्या बाहेरही विद्यार्थ्यांनी जोरदार गोंधळ केला. यावेळी धक्काबुक्कीही झाली.
अंतर्गत वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, मृत विद्यार्थी गौरव सिंहचे वडील राकेश सिंह हे बीएचयूमध्येच मोठ्या पदावर कार्यरत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement