एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धर्माच्या नावावर कोट्यवधी उधळता, मग शेतकऱ्यांना मदत का नाही? : भय्यूजी महाराज
इंदूर: एरवी भपंक महाराजांवर आणि देवकार्यासाठी लाखो उधळणारे लोक शेतकऱ्यांसाठी हात आखडता का घेतात? असा उद्विग्न सवाल भैय्यूजी महाराज यांनी विचारला आहे.
समाजकार्यातून निवृत्त झाल्यानंतर अनेक पैलूविषयी एबीपी माझाला त्यांनी मुलाखत दिली. माझ्या समाजकारणाच्या आर्थिक मर्यादा संपल्या आहेत. मी आता कर्जबाजारी महाराज झालो आहे. अशीही खंत त्यांनी बोलून दाखवली.
समाजकारणाबरोबरच, राजकारणातल्या खुपत असणाऱ्या गोष्टींवरही आम्ही त्यांना बोलतं केलं. याआधी आम्ही देखील शेतकऱ्यांना मदत केली. मात्र मदतकार्याचा कधीही इव्हेंट होऊ दिला नाही. असं सांगत त्यांनी भाजप सरकारला टोला लगावला. त्यांची सविस्तर मुलाखत तुम्ही आज सकाळी १० वाजता एबीपी माझावर बघू शकणार आहात. ज्यात भैय्यूजी महाराजांवर झालेला हल्ला, समाजकार्यातून निवृत्त होण्यामागचं नेमकं कारण. याबाबत त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement