एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पद्म पुरस्कार : देशातील आतापर्यंतचे 48 'भारतरत्न'

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' यांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षांनंतर 'भारतरत्न' पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' यांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षांनंतर 'भारतरत्न' पुरस्कारांची घोषणा झाली आहे. याआधी 2015 साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न बहाल करण्यात आला होता. त्याचवेळी मदन मोहन मालवीय यांनाही मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. त्यापूर्वी 2014 मध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सीएनआर राव यांचा, तर 2008 मध्ये पं. भीमसेन जोशी यांचा भारतरत्नने सन्मान करण्यात आला होता. आतापर्यंत 48 जणांना भारतरत्नने गौरवण्यात आलं आहे. 'भारतरत्न'चे सन्मानार्थी 1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ 2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल 3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ 4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते 5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते 6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान 7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री 8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक 9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक 10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक 11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती 12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती 13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक 14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान 15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान 16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती 17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग 18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक 19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक 20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते 21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री 22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते 23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते 24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान 25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री 26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान 27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री 28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक 29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक 30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती 31. गुलझारीलाल नंदा - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान 32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या 33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका 34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् -  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी कृषीमंत्री 35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते 36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक 37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ 38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री 39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका 40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक 41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक 42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ 43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू 44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ 45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान 46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती 47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते 48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Embed widget